उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादच्या अस्तेबल तराई भागात एका २४ वर्षीय मुलीने तिच्या दोन लहान भावांवर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी एकाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दोन्ही भावांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रविवारी मुलीला अटक केली, जिथे तिला सोमवारी तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

रविवारी पोलिसांनी आरोपी बहिणीला ताब्यात घेऊन मौदरवाजा पोलीस ठाण्यात आणले असता तिने हायव्होल्टेज ड्रामा घडवून चार महिला हवालदारांना मारहाण करून त्यांचा गणवेश फाडला. इतकंच नाहीतर तरुणीने स्टेशन प्रभारींसोबतही गैरवर्तन केलं. आकाश राजपूत आणि त्याचा मोठा भाऊ जयकिशन राजपूतने मढ दरवाजा पोलीस स्टेशन गाठले आणि रविवारी आपली मोठी बहीण आरती हिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

Monsoon 2022 Update: महाराष्ट्रात सुरू होणार मान्सूनचा परतीचा प्रवास, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा
आकाशने त्याच्या एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्याची बहीण आरती हिला रील्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याचे व्यसन होते. पण आजकाल तिची बहीण अतिशय वाईट व्हिडिओ पोस्ट करत होती. ज्यामुळे तिचे मित्र तिला टोमणे मारत होते आणि तिची चेष्टा करत होते.

रविवारी आकाशने बहिणीसोबत रील बनवण्यास विरोध केला. तेव्हा तिने तिच्यावर अमानुष हल्ला केला. इतकंच नाहीतर त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. जेव्हा मोठा भाऊ जयकिशनने त्याला वाचवण्यासाठी आला असता तिने त्यालाही मारहाण केली. आकाशने पोलिसांना सांगितले की, त्याची बहीण आजकाल विचित्रपणे वागत आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी बहिणीने वडील बदाम सिंह यांनाही सोडलं नाही. त्यामुळे पोलीस आता घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Parbhani : तुझे फोटो व्हायरल करील… तुला, पतीला आणि मुलांना खत्म करेन, धमकीनंतर महिलेवर…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.