नांदेड : “मनोज जरांगे पाटील काय बोलतात त्यापेक्षा आजची जी परिस्थिती आहे यावर मराठा नेतृत्वाने विचार करावा. त्या काळात मराठा समाजाच्या नेत्यांनी ऐकलं असतं तर आज मराठ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. दिल्लीतील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारने पुढाकार घेऊन मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देण्यापेक्षा मराठा म्हणूनच आरक्षण दिलं पाहिजे. ५० टक्यात न बसवता टक्केवारी वाढवून आरक्षण दिलं तर योग्य राहील अन्यथा इतर ८- १० टक्के समाजाला उर्वरित ५० टक्के आरक्षण दिल्यासारखं होईल. त्यामुळे मराठा समाजाच्या नेतृत्वाने याचा गांभीर्याने विचार करावा”, असं रिपब्लिकन सेनेचे नेते अॅड. आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलंय. ते नांदेड दौऱ्यावर होते.

मराठा पोरांमध्ये टॅलेंट आहे पण आरक्षण नसल्याने त्यांना लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावे लागत आहे, असं वक्तव्य मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर रिपब्लिकन सेनेचे नेते अॅड. आनंदराज आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करताना अशी वक्तव्य करणं महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दाला परवडणारी नाहीत, अशी भीती व्यक्त केली.

लायकी नसलेल्यांच्या हाताखाली मराठ्यांना काम करण्याची वेळ-जरांगेंचं वक्तव्य, आनंदराज आंबेडकरांकडून सडेतोड प्रत्युत्तर
आनंदराज आंबेडकर म्हणाले, “त्या काळात मराठा समाजाच्या नेत्यांनी ऐकलं असतं तर आज मराठ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. त्यामुळे मराठा समाजाचे नेते किती लायक होते आणि बाबासाहेबांचं काम हे सगळ्या जगाने पाहिलंय. आमची मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका आहे. गरिब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं आम्हालाही वाटतं. पण मराठ्यांना कुणबी म्हणून नाही तर मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे. ५० टक्यात न बसवता टक्केवारी वाढवून आरक्षण दिलं तर योग्य राहील अन्यथा इतर ८- १० टक्के समाजाला उर्वरित ५० टक्के आरक्षण दिल्यासारखं होईल”.

मराठा आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारच भुजबळांना पाठबळ देतंय का? जरांगेंचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सवाल
मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या, ही मागणी दुर्दैवी आहे. वेगळा प्रवर्ग करून मराठा म्हणूनच आरक्षण दिलं जावं. मराठा समाजाच्या नेतृत्वाने याचा गंभीरपणे विचार करावा. कुणबी समाजाचं प्रमाणपच्र मिळत त्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीतील डबल इंजिन सरकारने पुढाकार घ्यावा, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

जालन्यात ओबींसीचा एल्गार; जरांगे म्हणतात, मराठ्यांना आरक्षण मिळणारच!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *