शासनाकडून विमा कंपनीला 158 कोटींचा निधी मिळण्याची प्रतिक्षा:3.07 लाख शेतकऱ्यांचे डोळे शासनाकडे
हिंगोली जिल्हयात अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आदेश दिले आहेत. मात्र अद्याप शासनाकडून 158 कोटींचा निधी विमा कंपनीकडे वर्ग झाला नसल्याने 3.07 लाख शेतकऱ्यांनी अग्रीमसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. आता शासनाकडून निधी कधी वर्ग केला जाणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्हयात यावर्षी ता. 1 व ता. 2 सप्टे्ंबर रोजी तब्बल 141 मिलीमिटर पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन सह इतर पिकांचे नुकसान झाले. हाती आलेले पिक वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. जिल्हयातील परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मध्य हंगाम प्रतिकुल परिस्थिती लागू करण्यासाठी तातडीने नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हयातील 30 मंडळांमध्ये पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी गोयल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना 25 टक्के पिकविमा अग्रीम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी पिकविमा कंपनीला दिले आहेत. यामुळे जिल्हयातील 3.07 लाख शेतकऱ्यांना 158 कोटी रुपयांचा अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, शासनाने विमा कंपनीला सदर रक्कम वर्ग केल्यानंतरच विमा कंपनीकडून पिकविमा अग्रीम दिला जाणार आहे. अद्यापही शासनाने सदर रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केली नसल्याने पिकविमा देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर रक्कम मिळण्यासाठी विमा कंपनीकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात असून पुढील काही दिवसांतच हि रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या तरी जिल्ह्यातील 3.07 लाख शेतकऱ्यांचे शासनाकडे तसेच विमा कंपनीकडे लक्ष लागला असून आता शासनाकडून रक्कम कधी वर्ग केली जाणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय शेतकरी जिल्हयात औंढा नागनाथ तालुक्यात 49920 शेतकऱ्यांना अग्रीम मिळणार आहे. तसेच वसमत तालुक्यात 68589, हिंगोली 59554, कळमनुरी 58903, सेनगाव तालुक्यातील 70092 शेतकऱ्यांचा समावेश आहे.