संबंधांनंतर अति रक्तस्त्रावामुळे मुलीचा मृत्यू:प्रेयसीला रुग्णालयात नेण्याऐवजी रक्तस्त्राव थांबवण्याचे उपाय इंटरनेटवर शोधत राहिला प्रियकर, अटक
गुजरातमधील नवसारी येथे 23 वर्षीय नर्सिंग ग्रॅज्युएट तरुणीचा प्रियकरासोबत सेक्स केल्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी प्रियकर रक्तस्त्राव थांबवण्याचे उपाय ऑनलाइन शोधत राहिला. ही घटना 23 सप्टेंबरची आहे. पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार मुलीच्या योनीमार्गाचे ऊतक फाटले होते. जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. रुग्णवाहिकेला कॉल केला नाही पोलिसांनी सांगितले की, तरुणी आणि तिचा प्रियकर एका हॉटेलमध्ये होते. जिथे सेक्स केल्यानंतर मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे दोघेही चांगलेच घाबरले. रुग्णवाहिकेला कॉल करण्याऐवजी, तिच्या प्रियकराने रक्तस्त्राव थांबवण्याचे मार्ग ऑनलाइन शोधले. रिपोर्टनुसार, त्याने कापडाच्या साहाय्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फायदा झाला नाही. काही वेळाने तरुणी बेशुद्ध झाली. यानंतर घाबरलेल्या मुलाने आपल्या एका मित्राला हॉटेलमध्ये बोलावले आणि त्यानंतर महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले. कुटुंबीय म्हणतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर महिलेला मृत घोषित करण्यात आले. यानंतर महिलेच्या प्रियकराने तिच्या कुटुंबीयांना फोन केला मात्र ते रुग्णालयात पोहोचेपर्यंत तरुणीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला असून तिची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली आहे.