वाचा: Airtel युजर्ससाठी बॅड न्यूज, वर्षभर चालणाऱ्या लोकप्रिय प्लानमध्ये आता मिळणार नाहीत ‘हे’ फायदे, पाहा डिटेल्स
फोनवरील अॅप्स बंद करा:
स्मार्टफोन आता अधिक स्टोरेज आणि रॅमसह येतात. ज्यामुळे फोनमध्ये चालणारे अनेक अॅप्स एकाच वेळी काम करू शकतात. पण, यामुळे तुमचा इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो. जर तुमच्या फोनमध्ये जास्त Apps Active असतील तर फोनचा इंटरनेट स्पीडही कमी होईल. यापैकी काही अॅप्स बंद करा आणि तुम्हाला तुमचा इंटरनेट स्पीड अधिक फास्ट दिसेल.
कॅशे क्लियर करा:
कॅशे तुमच्या फोनचे इंटर्नल स्टोरेज वाढवते आणि तुमच्या फोनचा वेगही कमी करते. कॅशेसह तुमच्या फोनची प्रक्रिया कमी करते. जर तुम्ही तुमची कॅशे बर्याच काळापासून कॅशे क्लियर केले नसेल, तर नक्की करा, यामुळे तुमचा इंटरनेट स्पीड वाढेल.
ऑटो अपडेट बंद करा:
अॅप अपडेटमुळे इंटरनेट स्पीडही कमी होतो. अॅप अपडेट बॅकग्राउंडमध्ये होत असताना, फोन वापरताना तुम्हाला त्याचे परिणाम जाणवतात. म्हणून अॅप अपडेट्स बंद करणे आणि तुमच्या गरजेनुसार मॅन्युअली अपडेट करणे हे देखील सोल्युशन असू शकते.
लाइट अॅप्स वापरा:
जर तुम्ही डेली अॅप्सचे लाइट Version वापरत असाल, तर ते तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड वाढवेल तसेच सध्याची बँडविड्थ अधिक शक्तिशाली बनवेल. आज अनेक अॅप्स लाइट आवृत्तीसह येतात ज्यांना चालवण्यासाठी कमी डेटा आवश्यक असतो.
नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा:
ही एक खूप मोठी समस्या आहे ज्याबद्दल युजर्सना सहसा माहिती नसते. तुमचे नेटवर्क सेटिंग डीफॉल्टनुसार Automatically चालू होऊ शकते आणि यामुळे अनेकदा समस्या आणि इंटरनेट स्लो होऊ शकते. हे सेटिंग तुमच्या इंटरनेटच्या unstable Speed ची समस्या दूर करू शकते.