नवी दिल्लीःiPhone 12 : तुम्हाला जर कमी किंमतीत आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. २३ सप्टेंबर पासून सुरू होत असलेल्या अमेझॉनवरील ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल मध्ये आयफोन १२ वर चांगली ऑफर मिळणार आहे. या सेलमध्ये आयफोन १२ ला ३८ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट सोबत खरेदी करता येवू शकते. आयफोन १२ च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ७० हजार रुपये आणि ६४ जीबी व्हेरियंटची किंमत ६५ हजार रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये या फोनला ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते. अमेझॉन प्राइम मेंबर्स आयफोन १२ ला आज २२ सप्टेंबर पासून खरेदी करू शकतील.

आयफोन १२ वर काय आहे ऑफर
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२२ मध्ये ७० हजार रुपये किंमतीचा आयफोन १२ चे १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ४७ हजार ९९९ रुपये आणि ६५ हजार रुपये किंमतीच्या ६४ जीबी व्हेरियंटला ४२ हजार ९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. सोबत एसबीआय क्रेडिट कार्ड वरून खरेदी केल्यानंतर १५०० रुपयाचा इंस्टेंट कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन सुद्धा खरेदी करू शकतात. तसेच आयफोन १२ ला खरेदी करताना १४ हजार ४५० रुपयाची एक्सचेंज ऑफर सुद्धा मिळणार आहे. या सर्व ऑफर्स आणि कॅशबॅक सोबत आयफोन १२ चे १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ३२ हजार रुपये आणि ६४ जीबी व्हेरियंटला २७ हजार रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते.

वाचाः तुमचं आयुष्य आनंदी बनवण्यात रतन टाटा यांचा मोठा हात?, कसा तो जाणून घ्या

iPhone 12 ची स्पेसिफिकेशन

iPhone 12 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, आयफोनमध्ये Apple A14 बायोनिक चिपसेट आणि 4 जीबी रॅम सोबत आउट ऑफ बॉक्स iOS 14 मिळतो. फोन सोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन लेन्स १२ मेगापिक्सलचे आहेत. कॅमेरा सोबत ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सुद्धा मिळते. iPhone 12 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट मध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. iPhone 12 मध्ये ५जी सपोर्ट दिला आहे. आयफोन १२ ला २०२२ मध्ये ७९ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. फोनमध्ये MagSafe वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

वाचाः रोज 5GB डेटा देवून ‘या’ कंपनीने घातला धुमाकूळ, जिओसह दिग्गज कंपन्यांना फुटला घाम

वाचाः Apple कंपनीने चीनपेक्षा टाटावर दाखवला विश्वास, भारतात बनणार ‘मेड इन इंडिया आयफोन’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.