नवी दिल्ली: Offers On iPhone 14: आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक जबरदस्त ऑफर सध्या उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने लेटेस्ट Apple iPhone 14 स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येईल. या डीलमध्ये यूजर्स iPhone 13 च्या किमतीत iPhone 14 स्मार्टफोन खरेदी करू शकतील. Apple iPhone 14 वर खूप मोठी सूट दिली जात असून आयफोन 14 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. यावर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल जाणून घेऊया.

वाचा: Black Friday सेलमध्ये धमाकेदार डील, अर्ध्यापेक्षा कमी किमतीत घरी येईल Samsung चा महागडा स्मार्टफोन

iPhone 14 : ऑफर

अलीकडेच, Apple ने iPhone 14 ७९,९०० रुपयांना लाँच केला होता. पण, लाँचनंतर काही महिन्यांनी, iPhone 14 चे 128GB स्टोरेज मॉडेल आता Amazon वर सुमारे १५०० रुपयांच्या सवलतीनंतर ७८,४०० रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुम्ही एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने iPhone 14 स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला ५००० रुपयांची सूट मिळेल. यात, iPhone 14 ची किंमत ७३,४०० रुपये असेल.

वाचा: फोनमधून ताबडतोब डिलीट करा हे ४ Dangerous Apps, अन्यथा बँक अकाउंट रिकामे झालेच समजा

तसेच, iPhone 14 वर १६,३०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. म्हणजेच जुना स्मार्टफोन दिल्यावर १६,३०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. पण, ही सूट तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. अशा प्रकारे, सर्व ऑफ मॅनेज केल्यानंतर, iPhone 14 ची किंमत ५७,१०० रुपये असेल.

Apple iPhone 14 चे फीचर्स किलर:

Apple iPhone 14 मध्ये 6 core CPU A15 बायोनिक चिपसेट आणि ६.१ -इंचाचा OLED डिस्प्ले आहे. तर, iPhone 14 Plus मध्ये ६.७-इंच स्क्रीन आहे. यात १२ MP मुख्य कॅमेरा सेन्सर आहे, जो उत्तम Low Light फोटोग्राफी करतो. तसेच, मागील बाजूस अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. समोर डायनॅमिक आयलंड नॉच देण्यात आला आहे. आयफोन 13 च्या तुलनेत, आयफोन 14 सुधारित पॉवर बॅकअप अनुभव देतो.

वाचा: २४९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या ‘या’ Reliance Jio प्लान्समध्ये रोज 2GB Data सह, अनलिमिटेड कॉल आणि बरंच काहीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *