नवी दिल्ली : अनेकजण नवीन आयफोन मॉडेल लाँच होण्याची वाट पाहत असतात. जेणेकरून, जुने मॉडेल कमी किंमतीत खरेदी करता येईल. तुम्ही देखील अशाच यूजर्सपैकी असाल तर काळजी करण्याचे कारण नाही. Apple iPhone 13 च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. फोनला ई-कॉमर्स साइट Flipkart वरून तुम्ही आकर्षक ऑफर्ससह खरेदी करू शकता. लवकरच iPhone 14 लाँच होणार आहे. त्यामुळे त्याआधी आयफोन १३ च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. आकर्षक ऑफर्ससह आयफोन १३ ला स्वस्तात खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास iPhone 13 फक्त ५४,४४९ रुपये किंमतीत तुमचा होईल. iPhone 13 वर मिळणाऱ्या या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Father’s Day: ‘हे’ कूल गॅजेट्स फादर्स डे बनवतील खास, वडिलांना गिफ्ट देण्यासाठी आहे बेस्ट पर्याय

iPhone 13 ची किंमत आणि ऑफर्स

iPhone 13 ई-कॉमर्स साइट Flipkart वर खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. कंपनीने गेल्यावर्षी आयफोन १३ ला ७९,९०० रुपये किंमतीत लाँच केले होते. ही किंमत फोनच्या १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज बेस व्हेरिएंटची आहे. मात्र, फ्लिपकार्टवर हा फोन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ९,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर फोन ६९,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा न घेतल्यास तरीही ही खूप चांगली डील आहे.

वाचा: बाबो! ४६ वर्ष जुन्या Apple-1 कॉम्प्युटरची ‘इतक्या’ कोटींना विक्री, किंमत वाचून धक्का बसेल

एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास iPhone 13 ची किंमत अजूनच कमी होईल. या आयफोनवर १५,५०० रुपयांपर्यंत एक्सेचंज ऑफरचा फायदा मिळेल. मात्र, ही ऑफर जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा फोनफक्त ५४,९९९ रुपयात तुमचा होईल. मात्र, एक्सचेंज ऑफरसाठी तुम्हाला ही सर्विस तुमच्या भागामध्ये उपलब्ध आहे की नाही, हे देखील पाहायला लागेल. दरम्यान, आयफोन १३ च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि क्विक चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोन ५जी सपोर्टसह येतो. यात ए१५ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात १२ मेगापिक्सलचे दोन सेंसर्स आणि फ्रंटला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी आयपी६८ रेटिंग मिळाले आहे.

वाचा: Recharge Plans: एकाच रिचार्जमध्ये संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग-डेटासह ओटीटी बेनिफिट्स; पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.