नवी दिल्लीः Apple iPhone 14 सीरीजला नुकतेच ग्लोबली लाँच करण्यात आले आहे. या सीरीजची विक्री सुरू झाली आहे. या सीरीजच्या लाँचिंग नंतर भारतात iPhone 15 Ultra बद्दल माहिती समोर येत आहे. या फोनला पुढील वर्षी लाँच केले जावू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी अपकमिंग आयफोन १५ यूनिट्सवर यूएसबी टाइप सी पोर्ट उपलब्ध करणार आहे. या मॉडलमध्ये नवीन डायनामिक आयलँडची सुविधा दिली जावू शकते. जी सध्या आयफोन १४ प्रो मॉडलवर उपलब्ध आहे. वेनिला आयफोन १५ मध्ये A16 बायोनिक SoC दिले जावू शकते. तर iPhone 15 Pro मध्ये A17 बायोनिक SoC देण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध टिप्सटर LeaksApplePro (@LeaksApplePro) ने ट्विटरवर iPhone 15 सीरीजच्या मेन स्पेसिफिकेशन लीक करण्यात आले आहे. लीक माहितीनुसार, नवीन लाइनअप मध्ये चार मॉडल iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Ultra चा समावेश असू शकतो. सोबत या फोनच्या प्रो मॉडल मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला जावू शकतो. तर अल्ट्रा मॉनिकर सुद्धा दिले जावू शकते. आयफोन १५ सीरीजची किंमत ११९९ डॉलर (जवळपास ९५ हजार रुपये) पासून किंमत सुरू होईल. हा फोन आधीच्या तुलनेत जास्त महाग असेल.

वाचाः उद्यापासून वनप्लसचा दिवाळी सेल, १९ हजाराचा स्मार्ट टीव्ही ९ हजार ४९९ रुपयात मिळणार

टिप्स्टरच्या माहितीनुसार, कंपनी चार आयफोन १५ मॉडलवर जुने लाइटनिंग चार्जिंग पोर्ट यूएसबी टाइप सी पोर्ट मध्ये बदलू शकते. स्मार्टफोनसाठी यूनिव्हर्स चार्जिंग पोर्ट दिले जावू शकते. लीकनुसार, कंपनी डायनामिक आयलँड फीचर, जे आयफोन १४ प्रो मॉडलमध्ये दिले आहे. ते अपकमिंग सर्व आयफोन मॉडलमध्ये उपलब्ध होईल. Apple ला iPhone 15 Pro आणिiPhone 15 Ultra दोन्हींवर A17 बायोनिक SoC दिले जावू शकते. तर, iPhone 15 आणि iPhone 15 Plus लेटेस्ट A16 बायोनिक SoC दिले जावू शकते. आयफोन १५ लाइनअपसाठी ८के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट दिला जावू शकतो.

वाचाः Flipkart Big Billion days Sale मध्ये Vivo, Xiaomi सह ‘या’ डिव्हाइसेसवर बंपर ऑफ, पाहा डिटेल्स

वाचाः Diwali with Mi: ११ हजार रुपये स्वस्त मिळतोय शाओमीचा हा फोन, किंमत-फीचर्स पाहाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.