नवी दिल्लीः Irctc Ticket Booking : भारतीय रेल्वेने नवीन निर्णयांतर्गत ऑनलाइन बुक केल्या जाणाऱ्या तिकिटाची मर्यादा वाढवली आहे. IRCTC च्या वेबसाइट आणि अॅप द्वारे प्रवासी आता दुप्पट तिकिट बुक करू शकतात. जर तुमचे आधार कार्ड IRCTC ला लिंक केल्यास तुम्ही २४ तिकिट बुक करू शकतात. तर अकाउंट आणि आधार लिंक नसल्यास तुम्हाला फक्त १२ तिकिट बुक करता येऊ शकतात. आधी ही संख्या १२ आणि ६ अशी होती. ऑनलाइन तिकिट बुकिंगची ही सुविधा मिळवण्यासाठी कमीत कमी एका प्रवाशाचे आधार नंबर व्हेरिफाय असणे गरजेचे आहे. जर तुमचे IRCTC अकाउंट आणि Aahdaar Number लिंक नसेल तर तुम्ही फक्त १२ तिकिट बुक करू शकता.

IRCTC अकाउंट वरून आधार नंबर लिंक करण्याची सोपी पद्धत
IRCTC Account सोबत आधारला ऑनलाइन लिंक केले जावू शकते. आधार आणि आयआरसीटीसी अकाउंटला तिकिट बुक करण्याआधी लिंक करा. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. जाणून घ्या स्टेप बाय स्टेप.
सर्वात आधी IRCTC च्या अधिकृत ई-टिकिटिंग वेबसाइट www.irctc.co.in वर जा. त्यानंतर आपला आयडी आणि पासवर्ड एन्टर करा. त्यानंतर my profile tab मध्ये जा आणि Aadhaar KYC वर क्लिक करा. आता आपला आधार नंबर एन्टर करा. त्यानंतर सेंड ओटीपी ऑप्शन निवडा. यानंतर तुम्हाला आपल्या मोबाइल नंबर वर एक ओटीपी येईल. ओटीपी एन्टर केल्यानंतर व्हेरिफाय ऑप्शनवर क्लिक करा. व्हेरिफाय नंतर स्क्रीनवर केवायसी डिटेल्स दिसेल.
केवायसी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सबमिट बटनवर टॅप करा. यानंतर तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय होईल.

Aadhaar Number च्या प्रवाशांना जोडण्याची सोपी पद्धत
IRCTC च्या अधिकृत ई-टिकटिंग वेबसाइट www।irctc।co।in वर जा.
आपल्या प्रोफाइल सेक्शन मध्ये जावून मास्टर लिस्टवर क्लिक करा.
आता नवीन प्रवाशांना जसे, आधार नंबर, जेंडर, जन्मतिथीला आधार कार्डच्या अनुसार एन्टर करा.
त्यानंतर सबमिट ऑप्शन वर टॅप करा.

एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन प्रवाशाला मास्टर लिस्ट मध्ये पेडिंग स्टेट्स सोबत दिसेल. व्हेरिफिकेशन नंतर हे स्टेट्स तुम्हाला व्हेरिफाइड दिसेल.

वाचाः Recharge Plans: या प्लान्समध्ये भरपूर डेटा, Jio कडे सुद्धा नाही ‘हे’ फायदे

वाचा: Budget Smartphones: आकर्षक डिझाईन, जबरदस्त फीचर्स आणि बजेट किमतीत येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाचSource link

Leave a Reply

Your email address will not be published.