मुंबई : आयपीओमध्ये पैसे गुंतवून नफा कमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (इरेडा-IREDA) चा आयपीओ आज २१ नोव्हेंबर २०२३ रोजी गुंतवणूकीसाठी उघडला असून गुंतवणूकदारांना २३ नोव्हेंबरपर्यंत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. आयपीओच्या माध्यमातून २,१५०.२१ कोटी रुपये कंपनी उभारणार आहे.

IPO येण्याआधीच शेअरचा धुराळा, GMP पाहून गुंतवणूकदार नाचतील; पहिल्याच दिवशी मिळतील मजबूत रिटर्न्स
प्राइस बँड
इरेडाने आयपीओसाठी ३०-३२ रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित केले असताना यशस्वी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप २९ नोव्हेंबरला होईल तर शेअर्सचे लिस्टिंग ४ डिसेंबरला होऊ शकते. गुंतवणूकदार किमान ४६० शेअर्ससाठी आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. म्हणजे अप्पर प्राइस बँडनुसार गुंतवणूकदारांना किमान १४,७२० रुपये गुंतवावे लागतील.

ऑफर फॉर सेल
आयपीओमध्ये १,२९०.१३ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, १० रुपये दर्शनी मूल्य असलेले २६,८७,७६,४७१ शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये विकले जातील. सरकार हे शेअर्स विकणार आहे. कंपनीमध्ये सध्या सरकारची १००% भागीदारी असुंन नवीन शेअर्सच्या माध्यमातून उभारलेला पैसा कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कर्ज वितरणासाठी भांडवली आधार वाढवण्यासाठी वापरला जाईल.

IPO बाजारात टाटांची हवा, उघडण्यापूर्वीच आयपीओत गुंतवणुकीची संधी; GMP करेल हैराण
तज्ज्ञांचे मत
या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची की नाही याबद्दल तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया. राइट रिसर्चच्या संस्थापक आणि निधी व्यवस्थापक सोनम श्रीवास्तव यांनी या आयपीओचे सदस्यत्व घेण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त रिलायन्स सिक्युरिटीज, चॉईस, निर्मल बंग आणि मेहता इक्विटीजच्या विश्लेषकांनी कमी बेस, उच्च वाढ, मालमत्तेची गुणवत्ता सुधारणे आणि स्वस्त मूल्यांकन यामुळे आयपीओला सबस्क्राइब रेटिंग दिले आहे.

टाटांच्या शेअरवर सर्वच फिदा; एका घोषणेमुळे गुंतवणूकदारांकडून तुफान खरेदी, किंमत नव्या शिखरावर
जोखीम घटक
कर्जदारांच्या कर्जाची परतफेड करण्यात अक्षमतेमुळे इरेडाची अनुत्पादित मालमत्ता (NPAs) वाढू शकते. कंपनीचे क्रेडिट रेटिंग नुकतेच कमी करण्यात आले आहे. भविष्यात कोणतीही घसरण व्यवसायावर विपरित परिणाम करू शकते. कंपनीकडे पूर्वी ऑपरेशन्समधून नकारात्मक कॅश फ्लो होता आणि भविष्यात ऑपरेशन्समधून असा नकारात्मक कॅश फ्लो पुन्हा होणार नाही याची खात्री नाही.

Read Latest Business NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *