तुमच्या पेन्शनमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या हयातीत असल्याचा पुरावा बँक, पोस्ट ऑफिस यांसारख्या पेन्शन जारी करणाऱ्या प्राधिकरणाकडे जमा करावे लागेल. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतींचा अवलंब करू शकता. सर्वप्रथम, तुम्ही वैयक्तिकरित्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अन्यथा तुम्ही डिजिटल पद्धतीनेही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर स्टेटस नक्की तपासा
निवृत्ती वेतनधारकांना वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. या जीवन प्रमाणपत्राची वैधता १२ महिन्यांसाठी असते. ८० वर्षांवरील अतिज्येष्ठ नागरिकांना १ ऑक्टोबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२३ दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देण्यात आली होती, तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
दरम्यान, जर तुम्ही तुमच्या हयातीत असल्याचा पुरावा डिजिटल पद्धतीने सबमिट केला आहे आणि त्याची सबमिशन स्थिती तपासायची असेल, तर तुम्ही हे काम सहज करू शकता. डिजिटल लाइफ सर्टिफिकेटचे स्टेटस तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे…
- जेव्हा तुम्ही जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सबमिट करता तेव्हा तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक संदेश येतो.
- त्या संदेशात जीवन सन्मान पत्र प्रमाणपत्र आयडीशी संबंधित माहिती आहे.
- तुमच्या जीवन प्रमाणप्रसि स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रथम https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login वर लॉग इन करा.
- जीवन प्रमाणपत्र आयडी आणि कॅप्चा प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
- यानंतर तुम्हाला प्रमाणपत्राची स्थिती दिसू लागेल.
लाईफ सर्टिफिकेट जमा न झाल्यास काय करावे?
जर तुम्ही डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल, परंतु ते जमा झाले नसेल तर घाबरण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत शेवटची तारीख निघून गेल्यानंतरही तुम्ही बँक किंवा भारतीय पोस्ट ऑफिसची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवरूनही याबाबत माहिती मिळवू शकता.