गोकुळ झिरवळ तुतारीचा गमछा घालून शिवस्वराज्य यात्रेत सहभागी:म्हणाले – यात्रेत सहभागी होण्याचा माझा स्वत:चा निर्णय

गोकुळ झिरवळ तुतारीचा गमछा घालून शिवस्वराज्य यात्रेत सहभागी:म्हणाले – यात्रेत सहभागी होण्याचा माझा स्वत:चा निर्णय

राज्यभरात शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. मंगळवारी ही यात्रा नाशिक जिल्ह्यात पोहोचली होती. या यात्रेच्या कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ गळ्यात तुतारीचा गमछा घालून पाहायला मिळाले. त्यामुळे गोकुळ झिरवळ यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश झाल्याचे मानले जात आहे. गोकुळ झिरवळ यांनी नाशिकमध्ये ठिकठिकाणी शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे बॅनर लावले होते. दिंडोरीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक गोकुळ झिरवळ म्हणाले की, या शिवस्वराज्य यात्रेत मी स्वत:हून सहभागी झालो आहे. हा पूर्णपणे माझा निर्णय होता. मी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, पण या पक्षातून निवडणूक लढवण्यास माझ्यासोबत इतरही लोक इच्छुक आहेत. त्यामुळे ज्याला तिकीट मिळेल, त्याच्यासह महाविकास आघाडीचे काम करणार आहे. …त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही गोकुळ झिरवळ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. ही भेट मीच घ्यायला लावली, असे नरहरी झिरवळ यांनी सांगितले होते. तर त्यांनी मला तिकडे पाठवले की नाही, यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे गोकुळ झिरवळ म्हणाले. हेही वाचा… दिंडोरी विधानसभेची निवडणूक गाजणार?:नरहरी झिरवळ यांना मुलाचेच आव्हान? गोकुळ यांचा शरद पवारांच्या पक्षाला पाठिंबा आमदार नरहरी झिरवाळ यांचा पुत्र गोकुळ यांनी शरद पवार यांच्याबरोबर असून, त्यांनी संधी दिल्यास मी वडिलांविरोधात लढण्यास तयार आहे, अशी भूमिका जाहीर केल्याने आता दिंडोरीमध्ये वडीलांच्या विरोधात गोकुळ झिरवाळ उमेदवार असणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…

​राज्यभरात शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. मंगळवारी ही यात्रा नाशिक जिल्ह्यात पोहोचली होती. या यात्रेच्या कार्यक्रमात अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ गळ्यात तुतारीचा गमछा घालून पाहायला मिळाले. त्यामुळे गोकुळ झिरवळ यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश झाल्याचे मानले जात आहे. गोकुळ झिरवळ यांनी नाशिकमध्ये ठिकठिकाणी शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे बॅनर लावले होते. दिंडोरीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक गोकुळ झिरवळ म्हणाले की, या शिवस्वराज्य यात्रेत मी स्वत:हून सहभागी झालो आहे. हा पूर्णपणे माझा निर्णय होता. मी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, पण या पक्षातून निवडणूक लढवण्यास माझ्यासोबत इतरही लोक इच्छुक आहेत. त्यामुळे ज्याला तिकीट मिळेल, त्याच्यासह महाविकास आघाडीचे काम करणार आहे. …त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही गोकुळ झिरवळ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. ही भेट मीच घ्यायला लावली, असे नरहरी झिरवळ यांनी सांगितले होते. तर त्यांनी मला तिकडे पाठवले की नाही, यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे गोकुळ झिरवळ म्हणाले. हेही वाचा… दिंडोरी विधानसभेची निवडणूक गाजणार?:नरहरी झिरवळ यांना मुलाचेच आव्हान? गोकुळ यांचा शरद पवारांच्या पक्षाला पाठिंबा आमदार नरहरी झिरवाळ यांचा पुत्र गोकुळ यांनी शरद पवार यांच्याबरोबर असून, त्यांनी संधी दिल्यास मी वडिलांविरोधात लढण्यास तयार आहे, अशी भूमिका जाहीर केल्याने आता दिंडोरीमध्ये वडीलांच्या विरोधात गोकुळ झिरवाळ उमेदवार असणार अशी चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment