जालना: शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. केरुबा दिगंबर घोडके (५०) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. मयताने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केरूबा दिगंबर घोडके मठ तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. दुपारी साडेबारा वाजेच्या मधल्या सुट्टीच्या काळात मुलांना खिचडी खाण्यासाठी सोडण्यात आले. मुले खिचडी करण्यास घरी गेले असता शिक्षक केरूबा घोडके यांनी शाळेतील वर्गात लोखंडी अँगलला झेंड्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

अर्धवट शरीर असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला; परिसरात घटनेनं खळबळ
मुले दुपारची खिचडी खाऊन परत शाळेत आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. गावकऱ्यांनी ही घटना गोंदी पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. ३५ विद्यार्थी असलेल्या या शाळेत दोन शिक्षक होते. दुसरे शिक्षक कैलास जाधव हे केंद्र शाळेवर झिरपी येथे प्रशिक्षणासाठी गेलेले असल्याचे सांगण्यात आले. केरूबा घोडके हे पाचोड येथे वास्तव्यास होते.

दुसरीकडे, जालन्यातच एका कॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना आढळून आले आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीसांनी जालना शहरातील मंठा रोडवरील कॅफे फुड ट्रेझर कॉफी सेंटरवर कारवाई केली. यावेळी तीन जोडपी नको त्या अवस्थेत सापडली. यावेळी जोडप्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे तर कॉफी शॉपचा मालक सुमित कैलासपुरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळीत मोफत मिठाई वाटप करण्याचा विचार आहे? त्याआधी वाचा FDA चा मोठा निर्णय
या शॉपमध्ये महाविद्यालयीन तरुण- तरुणींना फुड शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी कंम्पार्टमेंन्ट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे निदर्शनास आले. यासाठी कॅबीनरुमसाठी २५० तर सोफासेट रुमचे ५०० रुपये चार्ज घेऊन या जागेचा वापर मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी बिनदिक्कतपणे दिला जात होता.

नुरा कुस्ती फिक्स करून ठेवलीय, निवडणूक येताच ओबीसी-मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न ; आव्हाडांचा आरोप

Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *