​नजर न हटण्यासारखा चिकनकारी लेहंगा​

​नजर न हटण्यासारखा चिकनकारी लेहंगा​

आथियाचे लग्न झाल्यापासूनच तिच्या लुकची सगळीकडे चर्चा आहे. मुळात अत्यंत मिनिमल मेकअप आणि तरीही इतकी सुंदर नवरी याचेच सगळीकडे कौतुक होत आहे. आथिया आणि राहुलने २३ जानेवारी रोजी लग्न केले. तर दोघांचेही सुंदर फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. आथियाने लग्नात परिधान केलेल्या लेहंग्याचीच आता सगळीकडे चर्चा आहे. अनामिका खन्नाने डिझाईन केलेल्या या लेहंग्याला तयार व्हायला ४१६ दिवस लागले. तर कामगार साधारण १० हजार दिवस काम करत होते. त्यामुळे या लेहंग्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असणार.

​सिल्क ऑर्गेंझा दुपट्टा​

​सिल्क ऑर्गेंझा दुपट्टा​

या लेहंग्यासह डोक्यावर जो दुपट्टा आथियाने घेतला होता. तो वेल आणि सिल्क ऑर्गेंझापासून तयार करण्यात आला होता. तर यावर चिकनकारी आणि नेट, जरदौसी वर्क करण्यात आले होते. अत्यंत बारीक कलाकुसर करून हा लेहंगा तयार करण्यात आला होता. पारंपरिक लाल रंगाऐवजी पेस्टल रंगाचा वापर केलेला हा लेहंगा आणि दुपट्टा होता. हा दुपट्टा रेशमच्या धाग्याने विणण्यात आला होता असे अनामिका खन्नाने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

(वाचा – मुलीच्या लग्नात सुनील शेट्टीचाच बोलबाला, साधेपणाने जिंकले मन, परंपरा जपत केली फॅशन)

​पोलकी दागिन्यांची निवड​

​पोलकी दागिन्यांची निवड​

या लेहंग्याचा लुक पूर्ण करण्यासाठी आलियाने पोलकी नेकलेस, त्यावर जड असे मॅचिंग कानातले, मांगटिका आणि मॅचिंग बांगड्या एका वेगळ्याच डिझाईनर कलिरेसह घातले होते. यामुळे आथियाचा लुक अत्यंत रिगल आणि रॉयल वाटत होता. पारंपरिक मल्टिलेअर कलिऱ्यांची जागी अत्यंत साधे आणि युनिक कलिऱ्यांची निवड आथियाने केली होती.

(वाचा – ओठांचे मग चुंबन…वनितामुळे पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा गेला वर, खऱ्या आयुष्यात आहे अत्यंत स्टायलिश)

​ड्यूई मेकअपचा साज​

​ड्यूई मेकअपचा साज​

अनेक ठिकाणी नवरीचा भडक मेकअप दिसून येतो. मात्र आथियाने ड्यूई मेकअपचा बेस ठेऊन त्यावर मिनिमल मेकअपची निवड केली होती. त्यामुळे अत्यंत नैसर्गिक असे सौंदर्य आलियाचे दिसून येत होते. तर फोटोग्राफर रोहन श्रेष्ठने आलियाचे सर्व फोटो काढले होते. यामध्ये नैसर्गिक प्रकाशात तिचे आणि राहुलच्या लग्नाचे सर्व फोटो काढण्यात आले होते. त्यामुळे दोघेही अत्यंत सुंदर आणि छान दिसत होते.

आथियाचा हा लुक तुम्ही तुमच्या लग्नासाठीही प्रेरणा म्हणून कॉपी करू शकता. एलिगंट आणि तितकाच आकर्षक लुक तुम्हाला हवा असेल तर अशा डिझाईनचा लेहंगा आणि पेस्टल रंगाचा वापर नक्कीच करता येऊ शकेल.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.comSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *