मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्कर २०२३ च्या क्रूने राजामौली आणि टीमला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोफत तिकीट दिलं नव्हतं. ऑस्करच्या नियमानुसार केवळ पुरस्कारार्थींना मोफत तिकीट दिलं जातं. त्यामुळे त्यांच्यातर्फे केवळ गाण्याचे संगीतकार आणि लेखक एमएम किरवानी आणि चंद्रबोस यांना त्यांच्या पत्नीसह ऑस्करमध्ये सहभागी होण्यासाठी मोफत तिकीट देऊ केलं होतं. मात्र राजामौली यांना हा सोहळा आणि तो खास क्षण तिथे उपस्थित राहून पाहायचा होता. त्यामुळे त्यांनी संपूर्ण टीमसाठी तिकिट काढली होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एका तिकिटाचा खर्च २५ हजार यूएस डॉलर्स म्हणजेच २० लाख ६ हजार इतका आहे. त्यामुळे राजामौली यांनी तब्बल ७ तिकिटं काढत सगळ्यांना ऑस्कर पाहण्याची संधी दिली.
इतकं होऊनही, तिकिटांसाठी दीड कोटी खर्च करूनही ऑस्कर टीमने त्यांना सभागृहाच्या सगळ्यात शेवटच्या रांगेतील तिकिटं देऊ केली होती. तो व्हिडिओ जेव्हा समोर आला होता तेव्हा मात्र सोशल मीडियावर ऑस्कर टीमला जोरदार विरोध दर्शवण्यात आला होता. त्यांना एक्झिट गेटच्या जवळ बसवल्यामुळे नेटकऱ्यांनी ऑस्कर टिमविरुद्ध प्रतिक्रिया देत आपला राग वक्त केला होता. मात्र आता राजामौली यांनी तिकिटांसाठी मोठी किंमत मोजल्यानंतरही त्यांना दिलेली ही वागणूक अनेकांना मुळीच पसंत पडलेली नाही.
‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा मोठा अपघात; बाइकस्वाराची धडक, थोडक्यात बचावला जीव