अदितीने तिने दिलेल्या असंख्य ऑडिशन्सबद्दलही लिहिले आणि त्यावेळी काम मध्येच न सोडल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘५ वर्षांच्या समर्पण आणि अगणित ऑडिशन्सनंतर आज मी जिथे आहे तिथपर्यंत पोहोचले आहे. मला आज माझ्या प्रवासाचा खूप अभिमान आहे. या प्रक्रियेत माझ्यासोबत जे काही घडले त्याबद्दल मी आभारी आहे. या गोष्टी मध्येच न सोडण्यासाठी आणि दरदिवशी चांगले आणि मजबूत होण्यासाठीचे प्रयत्न करण्याकरता मला फक्त माझी पाठ थोटपटायची होती.’
अदितीने स्वत:ला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे लिहिले की, ‘अदिती सर्वोत्कृष्ट गोष्टी होणे अजून बाकी आहे. मला तुझा अभिमान आहे!’ अभिनेत्रीने शेवटी तिने पोस्टला दिलेल्या कव्हर फोटोविषयी लिहिले आहे. तिने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शूट केलेल्या ऑडिशनचा फोटो कव्हर पिक्चरला लावला आहे. कारण प्रोडक्शनला तातडीने तशी गरज होती, त्यामुळे अभिनेत्रीने रस्त्यावरच शूटिंग केले होते. अदितीने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शूट केलेला ऑडिशन व्हिडिओ देखील शेअर केला आणि तिच्या समर्पणाने सर्वांना आश्चर्यचकित केले.