Fire In Hospital : या आगीबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितले की, त्यांनी प्रथम एक स्फोटाचा आवाज ऐकला. त्यानंतर रुग्णालयात आग लागल्याचे दिसले. ही आग इतकी भयानक होती की काही वेळातच ती रुग्णालयात पसरली. त्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. सुरुवातीला तर कोणाला काहीच कळेनासे झाले होते.