जालना: धनगर समाजाला ST म्हणजेच अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील गांधी चमन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला, पण मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी येण्यासाठी उशीर करीत आहेत या समजातून आंदोलक संतप्त झाले. या संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या तर वाहनांची तोडफोड केली.त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच धावपळ उडाली होती.

दोन महिन्यांपूर्वी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाला ST संवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते.या वेळी शासनाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेऊन ५० दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपली तरी सरकारने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठीधनगर समाजाच्यावतीने आज जालन्यात विशाल मोर्चा काढण्यात आला.

जायकवाडीसाठी नाशिक नगरमधील धरणांतून पाणी सोडणार? सुप्रीम कोर्टाचा स्थगिती देण्यास नकार, सुनावणीत काय घडलं?
धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार होते. परंतु या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी अधिकारी उशिराने पोहचत आहेत असा आंदोलकांचा समज झाला. त्या संतापातून मग जिल्हाधिकारी कार्यालयातील काचा आणि कुंड्यांची तोडफोड करत तिथे असलेल्या वाहनांची नासधूस केली.

निवेदन घेण्यासाठी अधिकारी न आल्याने धनगर बांधवानी आक्रमक भूमिका घेतली होती. या वेळी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आम्हाला वेडं समजू नका, नाहीतर निवडणुकांमध्ये तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही; धनगर आंदोलन पेटलं

Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *