मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात २०८ धावा करून देखील टीम इंडियाचा पराभव झाला. ३ सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने पिछाडीवर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah)चा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र पहिल्या टी-२० सामन्यात त्याला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले नव्हते.

बुमराह संघात नसल्याचा मोठा फटका टीम इंडियाला पहिल्या सामन्यात बसला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांची जोरदार धुलाई केली. यामुळे चाहत्यांनी जसप्रीत बुमराहला संघात का घेतले नाही असा सवाल सोशल मीडियावरून केला.

वाचा- पराभवानंतर हताश रोहित शर्माने दिला गंभीर इशारा; टी-२० वर्ल्डकपच्या आधी सुधारा नाही तर…

पहिल्या टी-२० सामन्यानंतर जसप्रीत बुमराह कधी प्लेइंग इलेव्हनमध्ये येणार यासंदर्भात मोठी अपडेट स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने दिले. दुखापतीमुळे बुमराह संघाबाहेर होता, आता तो फिट झाला असला तरी टीम इंडिया त्याला मैदानावर उतरवण्याची घाई करणार नाही.

आम्ही त्याच्यावर (बुमराह) अधिक दबाव टाकणार नाही. दुखापतीमधून बाहेर आल्यानंतर कमबॅक करण्यासाठी त्याला पूर्ण वेळ दिला जाईल असे हार्दिकने स्पष्ट केले. आम्हा सर्वांना कल्पना आहे की तो काय करू शकतो. तो संघासाठी फार महत्त्वाचा आहे. आता थोडी काळजी वाढू शकते पण या गोष्टी ठीक होतील. आम्ही खेळाडूंवर विश्वास ठेवतो. हे देशातील सर्वोत्तम १५ खेळाडू आहेत, असे हार्दिक म्हणाला.

वाचा- रोहित शर्माने पकडला कार्तिकचा गळा, LIVE सामन्यात असं घडलं तरी काय?

मंगळवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बुमराहची उणीव सर्वांना जाणवली. ऑस्ट्रेलियाने २०९ धावांचे आव्हान ४ विकेट राखून पार केले. अक्षर पटेल वगळता सर्व गोलंदाजांनी ११ पेक्षा अधिक सरासरीने धावा दिल्या.

वाचा-टी-२० वर्ल्डकपच्या आधी होणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच; वाचा कधी, कुठे आणि केव्हा

पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आशिया कप टी-२० मध्ये खेळला नव्हता. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. बुमराह संघात नसल्याने फार फरक पडतो. तो दुखापतीनंतर संघात आला आहे. त्यामुळे कमबॅकसाठी त्याला पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे, असे हार्दिक म्हणाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.