मुंबई: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी (Emran Hashmi Stone Pelting News) काश्मीरमध्ये झालेल्या दगडफेकीत जखमी झाल्याचे वृत्त सोमवारी समोर आले होते. याविषयी आता अभिनेत्याने ट्वीट करत माहिती दिली आहे. इम्रान त्याच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आहे. सोमवारचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो बाजारपेठेत गेला असताना ही घटना घडल्याचे समोर आलेले. याविषयी अभिनेत्याने ट्वीट करत माहिती दिली आहे. त्याने काश्मीरमधील लोकांबाबतही भाष्य केले आहे.

हे वाचा-महेश भट्ट यांनी स्वत:च्याच मुलीला केलेलं Lip Kiss; पूजासोबत लग्न करण्याचीही होती इच्छा

काय म्हणाला इम्रान?

इम्रानने (Emraan Hashmi Tweet) मंगळवारी २० सप्टेंबर रोजी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘काश्मीरमधील लोक खूप चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य करणारे आहेत. श्रीनगर आणि पहलगाममध्ये शूटिंग करणं फार आनंददायी होतं. मी दगडफेकीत जखमी झाल्याचं वृत्त चुकीचं आहे.’

इम्रानच्या या ट्वीटनंतर त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तो जखमी झालेला नाही किंवा त्याला काही झालेले नाही हे ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे. इम्रान ‘ग्राऊंड झिरो’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी पहलगाममध्ये होता. हा चित्रपट बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवर आधारित आहे. त्याआधी श्रीनगरमध्ये होता. एकूण १४ दिवसांचं त्याचं शूटिंग शेड्यूल जम्मू-काश्मीरमध्ये होतं. श्रीनगरच्या एसपी कॉलेजमध्ये शूटिंग संपल्यानंतर त्याने चाहत्यांना नाराज केल्याचेही वृत्त समोर आले होके. त्याने शूटिंग संपल्यानंतर चाहत्यांकडे पाहिलेही नाही असं विविध मीडिया रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलेले.

हे वाचा-प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात भरती; सिनेमाच्या सेटवर जखमी झाल्याने चाहते चिंतेत

समोर आलेल्या वृत्तानुसार, इम्रान आणि क्रू मेंबर्सवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर पहलगाम पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दगडफेक करणाऱ्यांवर कलम १४७, १४८, ३७०, ३३६, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान इम्रानत्या ‘ग्राऊंड झिरो’मध्ये मराठमोळ्या सई ताम्हणकरची वर्णी लागली आहे. सई इम्रानच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांचं असून यामध्ये सई-इम्रानसह जोया हुसैनदेखील आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.