नवी दिल्ली: 5G Spectrum Auction: देशात ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लिलावात टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली. जिओ देशात सर्वात स्वस्त ५जी सर्विस देखील उपलब्ध करणार आहे. याबाबत रिलायन्स जिओ इंफोकॉमचे चेयरमन आकाश अंबानी यांनी स्वतः माहिती दिली. ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात रिलायन्स जिओने जवळपास ८८,०७८ कोटी रुपये किंमतीचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. म्हणजेच, एकूण बोलीच्या ५८.६५ टक्के रक्कम रिलायन्स जिओने लावली आहे. थोडक्यात, ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावा दरम्यान रिलायन्स जिओने एकट्याने अर्ध्यापेक्षा अधिक स्पेक्ट्रम मिळवले आहे.

वाचा: Reliance Jio ची भन्नाट ऑफर! देत आहे १,५०० रुपये कॅशबॅक; करावे लागेल ‘हे’ काम

रिलायन्स जिओ व्यतिरिक्त इतर टेलिकॉम कंपन्या जसे की भारती एअरटेल (Airtel), वोडाफोन आयडिया (Vi) आणि अदानी नेटवर्कने (Adani Networks) मिळून एकूण ६२,०९५ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले. ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून (5G Spectrum Auction) सरकारला एकूण १,५०,१७३ कोटी रुपये मिळाले. तसेच, रिलायन्स जिओने देशातील सर्व २२ सर्कलसाठी ७००MHz स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. तज्ञांनुसार, ५जी सेवेसाठी ७०० MHz सर्वोत्तम फ्रिक्वेंसी आहे.

वाचा: एकच नंबर! जुना फोन द्या आणि नवीन घेऊन जा, अवघ्या ७५० रुपयात मिळेल Redmi चा हँडसेट

आकाश अंबानी यांनी याबाबत म्हटले की, जिओ जागतिक दर्जाची स्वस्त ५जी सर्विस देशात उपलब्ध करेल. जिओ ५जी भारतातील डिजिटल क्रांतीला प्रोत्साहन देईल. खासकरून, शिक्षण, आरोग्य, कृषि आणि ई-गव्हर्नेंस सारख्या सेक्टरमध्ये जिओ ५जी चा फायदा होईल. आकाश अंबानी म्हणाले की, नवीन टेक्नोलॉजी स्विकारून भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनावी, असा आमचा नेहमीच विचार आहे.याच विचाराने जिओचा जन्म झाला आहे. जिओच्या ४जी रोलआउटचा प्रभाव देखील मोठा आहे. आता जिओ ५जी टेक्नोलॉजीच्या सेक्टरमध्ये नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

वाचा: ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण, जिओने मारली बाजी; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची लागली बोलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.