नवी दिल्लीः reliance jio cheapest 2gb daily data plan : Reliance Jio आपल्या ग्राहकांना स्वस्त प्लान ऑफर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. जिओ कडे असे खूप सारे प्लान्स आहेत. जे एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत खूप स्वस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका प्लान संबंधी माहिती देत आहोत. या प्लानची किंमत २४० रुपये आहे. या प्लानमध्ये दररोज २ जबी डेटा मिळतो. जिओचा हा प्लान वेबसाइट सोबत मोबाइल ॲप माय जिओ द्वारे सुध्दा उपलब्ध करण्यात आला आहे. हा प्लान महिन्याच्या हिशोबाप्रमाणे येत नाही. तर ८४ दिवसाच्या वैधते सोबत येतो. जाणून घ्या रिलायन्स जिओच्या या शानदार प्लान संबंधी.

२४० रुपयात रोज २ जीबी डेटा देणारा प्लान

आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ प्रीपेड प्लान संबंधी माहिती देत आहोत. आम्ही ज्या प्लान संबंधी माहिती देत आहोत. तो प्लान ७१९ रुपयाचा प्लान आहे. या प्लान सोबत यूजर्सला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. ८४ दिवसासाठी एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. या प्लान सोबत JioSecurity, JioCloud, JioCinema, आणि JioTV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. २ जीबी डेटा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होवून 64 Kbps होते.

वाचाः पुढील ८ वर्षात स्मार्टफोन कुठेच दिसणार नाही, फोनची जागा हे प्रोडक्ट घेणार, बिल गेट्सची भविष्यवाणी

२३९ रुपयात १.५ जीबी डेटा
या प्लानला महिन्याच्या हिशोबानुसार, कॅलक्यूट केल्यानंतर या प्लानचा खर्च फक्त २४० रुपये आहे. २३९ रुपयात जिओ यूजर्संना २८ दिवसासाठी रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. दररोज १.५ जीबी पेक्षा जास्त डेटा हवा असेल तर तुम्ही या प्लानला निवडू शकता.

वाचाः ATM मधून पैसे काढताना ‘या’ चुका कराल तर अकाउंट होईल रिकामे, मिनिटांत गमवाल आयुष्यभराची कमाई

वाचाः कंपन्यांची मनमानी TRAI ने रोखली, ३० दिवसाच्या वैधतेच्या रिचार्ज प्लानची लिस्ट जारीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.