नवी दिल्ली: Jio One Year Validity Plan: रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड प्लान्सना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले आहे. रिलायन्स जिओचे ४९९ रुपये, ७१९ रुपये आणि २९९ रुपयांचे तीन प्लान्स आहेत, जे कंपनीने लोकप्रिय श्रेणीमध्ये ठेवले आहेत. Jio चे हे सर्व प्रीपेड प्लान्स अनलिमिटेड कॉलिंग, ९१२.५ GB पर्यंत डेटा आणि Jio अॅप्समध्ये प्रवेश देतात. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये आणखी कोणते फायदे मिळतील ते जाणून घेऊया.

वाचा: Budget Smartwatches: फेस्टिव्ह सिझनमध्ये गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत ‘या’ स्मार्टवॉचेस, किंमत २००० रुपयांपेक्षा कमी

४९९ रुपयांचा प्लान

या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे आणि यामध्ये दररोज २ GB डेटा मिळतो. त्यानुसार ग्राहक एकूण ५६ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर, वेग ६४ Kbps पर्यंत घसरतो. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स उपलब्ध आहेत. याशिवाय या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सची सदस्यता देखील मोफत उपलब्ध आहे.

वाचा: Budget Smartwatches: फेस्टिव्ह सिझनमध्ये गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत ‘या’ स्मार्टवॉचेस, किंमत २००० रुपयांपेक्षा कमी

७१९ रुपयांचा प्लान:

जिओच्या ७१९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच, कंपनी ग्राहकांना एकूण १६८ जीबी डेटा ऑफर करते. डेली डेटा संपल्यानंतर, वेग मर्यादा ६४ Kbps पर्यंत कमी केली जाते. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल देखील उपलब्ध आहेत. म्हणजेच, ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस देखील मिळतात.Reliance Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, Jio Cinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.

वाचा: Samsung स्मार्टफोनवर १३ हजार रुपयांपर्यंत सूट, २० हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार १०८ MP कॅमेरा

२९९९ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओच्या २९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. यामध्ये दररोज २.५ GB डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहक एकूण ९१२.५ जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. या रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. यासोबतच दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन १ वर्षासाठी उपलब्ध आहे. याशिवाय, वर्धापन दिन ऑफर अंतर्गत, या प्लामध्ये ग्राहकांना ७५ B अतिरिक्त डेटा, Ajio, Netmeds Ixigo, Reliance Digital आणि Jio Saavn Pro चे कूपन देखील दिले जात आहेत.रिलायन्स जिओच्या इतर योजनांप्रमाणे, JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

वाचा: २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणाऱ्या या Jio Plans बद्दल माहितेय ? सुरुवातीची किंमत ९१ रुपये



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.