जुना राष्ट्रीय महामार्ग ते वेरूळ रस्त्यावर खड्डे:उड्डाणपुलाखालून तीन ते चार किलोमीटर फेरा मारून यावे लागते
वेरूळ गाव ते बायपास (राष्ट्रीय महामार्ग २११) हा जुना रस्ता फक्त दोन किमी अंतराचा आहे. परंतु या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना हॉटेल एलोरा क्राऊनजवळ असलेल्या उड्डाणपुलाखालून तीन ते चार किलोमीटर फेरा मारून यावे लागते. जुना रस्ता हा खड्ड्याचा झाल्याने लहान वाहने चालवणे कठीण झाले आहे. नवीन रस्ता झाल्यापासून हा रस्ता रहदारीचा असून दुर्लक्षित झाला आहे. सतत पाऊस सुरू असल्याने डांबरी रस्ते उखडून मोठे खड्डे पडल्यामुळे चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. कधी वाहन खड्ड्यातून उसळून नियंत्रण सुटेल व अपघात होईल याचा नेम नाही. अशा खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनाला हादरे बसून तेही वारंवार नादुरुस्त होत आहेत. चाक पंक्चर होणे ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ यानुसार अतिरिक्त खर्च वाढला आहे. एमएसआरडीसीने लक्ष देऊन हा रस्ता बनवावा अशी मागणी वेरूळ ग्रामस्थांकडून होत आहे. चालक मोहसीन पटेल यांनी सांगितले की, या खड्ड्यांमुळे माझ्या गाडीचे चेंबर फुटले आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा. सुनील भाऊ यांनी सांगितले की, या रस्त्याने रिक्षा चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे खड्डे बुजवून रस्ता नवीन करावा.