पुणे : जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळा आणि खंडाळा दरम्यान असलेल्या मयूर हॉटेल समोरील वळणावर एक भरधाव वेगातील कंटेनर पलटी होऊन त्याची धडक दोन दुचाकी गाड्यांना बसली. या अपघातात एक लहान मुलगी आणि इतर दोघे असा तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. आज (शनिवारी) दुपारी पावणे तीनच्या मारास हा भीषण अपघात झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना दिवसभर जाण्यास बंदी असताना देखील पुण्याच्या बाजूकडून मुंबईच्या दिशेने एक मोठा कंटेनर जात होता. लोणावळा शहरातून काहीसा पुढे गेल्यानंतर उतारावरील वळणावर हा कंटेनर पलटी झाला. कंटेनर घसरत पुढे जाऊन लोणावळ्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना धडकला. या धडकेने दुचाकीवर असणारी एक लहान मुलगी आणि दोन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मुलं आणि दोघेजण जखमी झाले आहेत.
पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरातून अवजड वाहनांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे,असे असताना देखील कंटेनर जुन्या महामार्गावरून जात होता. त्यामुळे हा अपघात झाला आहे. या कंटेनर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा गाशा गुंडाळला; सेमीफायनलचे ४ संघ ठरले, नॉकआउट लढतीचे संपूर्ण वेळापत्रक
जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसा लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातलेली आहे, असे असताना देखील ही अवजड वाहने आतमध्ये येतात कशी ? महामार्ग पोलीस आणि लोणावळा पोलीस यांनी वळवण येथील एन्ट्री पॉइंट वरून ही वाहने एक्स्प्रेस वे वर वळविणे गरजेचे आहे. मात्र, नियम पाळले जात नसल्याने आज सणासुदीच्या दिवशी निष्पाप नागरिकांचे जीव गेले आहेत, अशी संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

प्रचंड कर्ज अन् वाढती तूट, अमेरिकेवर ‘मूडीज’चा मूड ऑफ! जाणून घ्या महासत्तेवर सध्या किती मोठा धोका?Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *