कालिदास कोळंबकर यांचा वडाळा मतदारसंघातून विजय:यापूर्वी 8 वेळा झाले आमदार, आदिती तटकरेंही झाल्या विजयी
वडाळा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे 9 व्यादा विजयी झाले आहे. जवळपास 22 हजार मतांनी त्यांचा विजय झाला आहे. कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. नारायण राणेंनी जेव्हा जेव्हा पक्ष बदलला, तेव्हा तेव्हा कोळंबकरांनीही त्यांच्याबरोबर पक्ष बदलला आहे. 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. 2019 पर्यंत सतत निवडणुका जिंकत आलेत. आदिती तटकरेही विजयी श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्याविरोधात अनिल नवगणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. संजय राऊतांची टीका मोदी – शहा – फडणवीस यांनी काय दिवे लावले की ते 120 च्या पुढे गेले? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. सध्याचा जो कौल आहे, याला कौल कसा म्हणावे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा जनतेचा कौल नव्हता, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही ग्राउंडवर होतो, त्यामुळे आम्हाला जनतेचा कॉल माहिती होता. हे निकाल अदानी यांनी लावून घेतले आहेत. या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही माणणाऱ्या माणसाचा विश्वास बसूच शकत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.