कालवा सल्लागार समितीने केलेल्या नियोजनाला प्रकल्प कार्यालयाकडून केराची टोपली:पाणी पाळ्याचे आवर्तन बदलल्याचा आरोप, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कालवा सल्लागार समितीने केलेल्या नियोजनाला प्रकल्प कार्यालयाकडून केराची टोपली:पाणी पाळ्याचे आवर्तन बदलल्याचा आरोप, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणाच्या पाणी पाळ्याचे कालवा सल्लागार समितीने केलेल्या नियोजनाला प्रकल्प कार्यालयाकडून केराची टोपली दाखवल्याचा आरोप पाणी हक्क संघर्ष समितीने केला आहे. पाणी पाळ्याचे आवर्तन बदलणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाणी पाळ्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले होते. यामध्ये उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामात ता. १ ते ता. २५ मार्च या कालावधीत पहिली पाळी, ता. १ एप्रील ते ता. २५ एप्रील दुसरी पाळी, ता. १ मे ते ता. २७ मे तिसरी पाळी तर ता. १ जून ते ता. २७ जून या कालावधी चौथी पाणी पाळी देण्याचे ठरले होते. त्यानुसार उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कर्यालयाने पाणी पाळ्या सोडणे आवश्‍यक होते. मात्र कार्यालयाने ता. १ मार्च रोजी सुरु केलेली पाणीपाळी ता. २५ मार्च रोजी बंद करणे आवश्‍यक असतांना पाणी पाळी पूर्णपणे बंद केली नाही. त्यामुळे अर्धा कालवाभरून पाणी वाहात होते. तर ता. १ एप्रील पासून दुसरी पाणी पाळी सोडणे अपेक्षीत असतांना ता. ३० मार्च पासूनच दुसरी पाणीपाळी सोडली आहे. दरम्यान, यामध्ये कालवा सल्लागार समितीच्या नियोजनला बगल देऊन राजकीय दबावापोटी पाणी आवर्तन सुरु ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून धरणाचे पाणी झपाट्याने कमी होऊ लागले आहे. इसापूर धरणावर कळमनुरी शहरासह प्रादेशीक पाणी पुरवठा योजना व इतर ग्रामीण भागातीाल पाणी योजना अवलंबून आहेत. धरणातील पाणी पातळी कमी झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर सल्लागार समितीच्या निर्णयाला डावलून पाणी पाण्यात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पाणी हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक नंदकिशोर तोष्णीवाल, रामवाडी येथील सरपंच टाले, मसोडच्या सरपंच पुष्पा कुरवडे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी केली आहे. पाणी पाण्याच्या तारखेत मागे पुढे होऊ शकते उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता हनुमंत धुळगुंडे म्हणाले, इसापूर धरणातून पाणी पाळी सोडतांना मुळात संपूर्ण शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे हा उद्देश आहे. सल्लागार समितीच्या बैठगकीमध्येच पाणी पाळीच्या तारखेत बदल होऊ शकतो असे स्पष्ट केले जाते. पाणी पाळीबाबत राजकिय दबाव नाही.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment