ठाणे : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळ्याजवळ असलेल्या वासुंद्री गावात जळीतकांडाचा भयानक प्रकार घडला. वासुंद्री रोडला असलेल्या नारायण निवासमध्ये राहणाऱ्या एका महिला आणि तिच्या दोन लहान मुलींना घरात बंदिस्त करुन तिच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांना घरात जिवंत जाळण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या घराच्या आजुबाजूला असलेल्या रहिवाशांच्या घरांना हल्लेखोरांनी कड्या लावल्या होत्या. त्यामुळे हे सर्व रहिवासी घरात कोंडून राहिले होते. मात्र तरीही या महिलेने प्रसंगावधान राखून आपल्या मुलींसह स्वतःचा बचाव केला. (A bad incident happened to a woman and a girl in Vasundri village near Kalyan)

या महिलेने बंदिस्त घरातून ओरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवासी रात्री दीड वाजता जागे झाले. त्यांना योगेश पाटील यांच्या घराला आणि घरासमोरील रिक्षाला आग लागल्याचे लक्षात आले. रहिवाशांनी घराच्या दरवाजाला बाहेरून लावलेली कडी काढून महिलेसह तिच्या दोन्ही मुलींना सुखरुप बाहेर काढले. मात्र तत्पूर्वी ही महिला आणि तिच्या आठ आणि दोन वर्षाच्या मुली धुराने कोंडून गुदमरल्या होत्या. शेजारील घरांच्या दरवाजांना बाहेरुन कड्या लावण्यात आल्याने तेही रहिवासी घराबाहेर पडणार नाहीत, अशी व्यवस्था हल्लेखोरांनी केली होती.

१ रुपयांत नाष्टा, १० रुपयांना जेवण; गरजूंसाठी तृतीयपंथीयांची कल्याणमध्ये आगळीवेगळी सेवा
योगेश पाटील (३६ वर्षे) हे टिटवाळ्यातील वासुंद्री रोडला असलेल्या नारायण निवासमध्ये पत्नी दीपाली, आराध्या (८ वर्षे) आणि क्रिशा (२.६ वर्षे) या दोन मुलींसह राहतात. योगेश हे शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत नोकरी करतात. योगेश आणि मांडा गावातील लालचंद पाटील, बबलेश पाटील, नरेश पाटील, आशीष पाटील यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहेत. आठ वर्षांपूर्वी पाटील बंधूंनी योगेशला मारहाण केली होती. तेव्हापासून त्यांच्यात धुसफूस सुरू आहे.

Eknath Shinde : भाजपच्या मंत्र्याचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा!, ‘त्यावेळी केलेले पाप आता धुवून काढा’
बुधवारी योगेश रात्रपाळी कामासाठी कंपनीत गेले. घरी पत्नी व दोन लहान मुली होत्या. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या खिडकीजवळ बोलण्याचा आवाज आला. त्यावेळी योगेश यांची पत्नी दीपाली हिने प्रसंगावधान राखून घरातील लाईट बंद केल्या. खिडकीतून आरोपी लालचंद, बबलेश, नरेश, आशिष हे तेथून हातात ड्रम, बोळे घेऊन पळताना दीपाली हिने पाहिले. आरोपींनी जमिनीच्या वादातून योगेश यांच्यावर राग काढण्यासाठी घरावर पेट्रोल टाकून त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात घरातील सामान जळाले. तर घरासमोरील योगेश यांची एम एच 05/ डी क्यू/ 4026 क्रमांकाची रिक्षा जाळून टाकण्यात आली.

पहाटे ६ वाजेपर्यंत काम करणाऱ्यांना ठाण्यातील खड्डे का दिसत नाहीत? राजन विचारेंचा मुख्यमंत्र्याना सवाल
जमिनीच्या वादातून आपल्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल योगेश यांनी आरोपींच्या विरुध्द तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून योगेश पाटील यांच्या जबानीवरून भादंवि कलम 440, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. या घरातील सोफा, पडदे, वायर, २ फॅन, लाईट्स, बोर्ड, टीव्हीसह रिक्षा असे ६५ हजार रुपये किंमतीचे सामान जळून खाक झाले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक दिलीप देशमुख अधिक तपास करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.