मुंबई– पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाहने कंगना राणौतला आपल्या देश पाकिस्तानबद्दल वाईटसाईट बोलल्याबद्दल फटकारले आहे. ‘हद कर दी विथ मोमीन साकिब’ या चॅट शोमध्ये नौशीनने सांगितले की, तिला कंगनाला भेटून तिला दोनदा कानाखाली मारायला आवडेल. त्यानंतर अभिनेत्री पुढे म्हणाली की कंगनाला इतर लोकांबद्दल आदर नाही. तिने तिच्या कामावर, तिच्या विवादांवर आणि तिच्या माजी प्रियकरांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाहने म्हटले आहे की, कंगना राणौत ही एक अति करणारी महिला आहे.

साडी, मोत्यांची माळ आणि काळा चश्मा; कंगना रणौतचा एअरपोर्टवर हटके अंदाज

‘हद कर दी विथ मोमीन साकिब’ या शोमध्ये नौशीन शाहला बॉलिवूडमध्ये अशी कोणती अभिनेत्री आहे का, जिला भेटायला आवडेल असे विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने कंगना राणौतचे नाव घेत सांगितले की, तिला भेटून तिच्या कानाखाली मारायची आहे. ती म्हणाली, ‘ती ज्या प्रकारे माझ्या देशाबद्दल काहीही बोलत आहे, ज्या प्रकारे ती पाकिस्तानी लष्कराबद्दल खूप बोलते, मी तिच्या हिंमतीला सलाम करते. तिला काही ज्ञान नाही पण ती देशाबद्दल बोलते, तेही दुसऱ्याच्या देशाबद्दल. तिने तिच्या देशावर, तिच्या कामावर आणि तिच्या माजी प्रियकरांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

नव्वदीच्या झाल्या गानसम्राज्ञी,आशा भोसले यांनी गायनासोबतच अभिनयातही दाखवलेली जादू
पाकिस्तानी अभिनेत्रीने कंगनाला सुनावले

ती पुढे म्हणाली, ‘पाकिस्तानमध्ये लोकांशी गैरवर्तन केले जाते हे तुम्हाला कसे कळते? तुम्हाला पाकिस्तानी लष्कराबद्दल कसे माहिती आहे? तुम्हाला आमच्या एजन्सीबद्दल कसे माहिती आहे? आम्हाला स्वतःला याबद्दल माहिती नाही, एजन्सी आमच्या देशात आहेत, सैन्य आमच्या देशाचे आहे, ते या गोष्टी आमच्याशी शेअर करत नाहीत. ते गुप्त आहेत. नौसीननेही नंतर कंगनाच्या अभिनयाचे कौतुक केले.

आशा भोसलेंची ही गोष्ट लतादीदींना नेहमीच खटकायची, पण तरीही दोघींमध्ये होता जिव्हाळा
कंगना रणौतचे आगामी चित्रपट

कंगना बॉलिवूड आणि सोशल मीडियावर राजकारणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सतत बोलते. अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट ‘चंद्रमुखी २’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये ती राजाच्या दरबारातील नर्तकीची भूमिका साकारत आहे, जी तिच्या सौंदर्यासाठी आणि नृत्यासाठी प्रसिद्ध होती. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. याशिवाय तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. तिच्याकडे ‘तेजस’ हा अॅक्शनपटही आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *