कापूस-सोयाबीन अनुदान योजना- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2398 कोटी रुपये अनुदान वितरित
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतुन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर च्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2398 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. 2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीन साठी 2646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटी द्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला. आज जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसं तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… जागावाटपाचा निर्णय दोन-चार दिवसांतच शक्य:मविआच्या बैठकीआधीच खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या तीन-चार दिवसांत परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबाबत बैठकांची फेरी सुरू झाली असून घटक पक्षांचीही आजही बैठक सुरु असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पूर्ण बातमी वाचा… नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांचे मंत्रालयालयासमोर आंदोलन:धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षणास विरोध सरकारमध्ये असूनही आमचे ऐकले जात नाही. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे. आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्याला विरोध करत झिरवळ यांनी मंत्रालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला समाजाने सभागृह पाठवले आहे. त्यामुळे आम्ही समाजासाठी भांडणार असल्याचे त्यांनी म्हणाले आहे. मात्र राजीनामा देणे हा पर्याय नाही. आम्हाला समाजाने समाजासाठी भांडण्याला सभागृहात पाठवला आहे. आम्ही देखील समाजासाठी भांडण करायला तयार असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…. धारावीच्या मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात:या आधी मनपाला झाला होता मोठा विरोध धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास ट्रस्टने सुरुवात केली आहे. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला होता. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुकतेच ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे. पूर्ण बातमी वाचा… पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला:गणेवशाचे धक्कादायक चित्र; विरोधी पक्षाचा राज्य सरकारवर निशाणा राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहेत. सरकारी शाळे मधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचे दशा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केली आहे. या संबंधात दानवे यांनी एका शाळकरी विद्यार्थ्यांचा गणवेशातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा… भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव:परिवर्तनाची चाहूल असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे गटाचा BJP वर जोरदार हल्ला तरुणांचा आवाज म्हणून विद्यापीठांच्या ‘सिनेट’कडे पाहिले जाते. फी, परीक्षा, अभ्यासक्रम यावर तेथे चर्चा घडतात व निर्णय होतात. पदवीधरांचा आवाज हा लाखो तरुणांचा आवाज आहे. तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्या पदवीधरांच्या सिनेट निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत हे धोरण पराभवाच्या भयातून आले होते. मात्र मुंबई विद्यापीठात पदवीधरांनी भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव केला. ही परिवर्तनाची चाहूल असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण बातमी वाचा…