केंद्रपाडा : भगवान कार्तिकेश्वराच्या मूर्तीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान बुधवारी फटाके फोडताना मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे ५० जण भाजले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी २५ जण गंभीररित्या जळाले आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वैदकीय मदत आणि पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

केंद्रपाडा डीएम अमृत ऋतुराज यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, विसर्जनाच्या ठिकाणी विविध पूजा पंडालमध्ये फटाके फोडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी फटाक्यांमधून निघणारी ठिणगी फटाक्यांच्या ढिगाऱ्यावर पडली, त्यामुळे स्फोट झाला आणि लोक भाजले. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन जळालेल्या लोकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील बलिया बाजार इथे हा प्रकार घडला आहे.

व्हॉट्सॲपवर बुकिंग, हॉटेलात सेटिंग; रुममध्ये १० मुलींची अवस्था पाहून पोलीस हादरले; PHOTOS व्हायरल

येथील डॉक्टरांनी अनेकांची गंभीर स्थिती पाहून त्यांना एससीबी मेडिकल कॉलेज आणि कटक हॉस्पिटलमध्ये रेफर केले आहे. बलिया प्रदेशात संक्रांतीनंतर कार्तिकेश्वर मूर्तीचे विसर्जन मोठ्या उत्सवाने होते. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना काही रॉकेट फटाक्यांच्या दुकानात पडून स्फोट झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ५० हून अधिक लोक भाजले गेले आणि त्यापैकी काही स्फोटाच्या ठिकाणी सर्वात जास्त प्रभावित झाले.

स्थानिकांनी दावा केला की २० हून अधिक रॉकेट एकाच वेळी पेटले होते. त्यानंतर स्फोट झाला आणि सर्वत्र आग दिसत होती. एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने जळीत रुग्णांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

घराच्या वंशानेच कुटुंब संपवलं; एकाच दिवशी वडील, २ बहिणी अन् आजीची निर्घृण हत्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *