कासचा पुष्पोत्सव पर्यटकांसाठी खुला:कास पुष्प पठारावर सात वर्षातून एकदा उमलणारी टोपली कारवीने व्यापले संपूर्ण पठार
महाराष्ट्रासह देशातील पर्यटकांना भुरळ घातलेले सातारा जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख असलेल्या जागतिक वारसा स्थळ लाभलेल्या कास पुष्प पठारावरील पुष्पोत्सवास आज पासून सुरुवात झाली. सातारा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांचे हस्ते या हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सातारा प्रदीप रौधाळ,सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण, जावली वनपरिक्षेत्र अधिकारी अर्जुन गमरे, जावली तहसीलदार हनुमंत कोळेकर, महसूल नायब तहसीलदार स़ंजय बैलकर , कास पठार कार्यकारी समिती अध्यक्ष दत्तात्रय किर्दत, माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांचेसह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. सद्यस्थितीत कास पुष्प पठारावर सात वर्षातून एकदा उमलणारी टोपली कारवी संपूर्ण पठार व्यापले असून त्याच्याच जोडीला कोळी कारवी, इटारी कारवी ही देखील उमललेली असल्याने पर्यटकांना पर्वणीच सुरू झाली आहे. या तीनही प्रकारातील कारवी या एक ते दोन महिने राहणार असून यावर्षी पर्यटकांना वेगळीच अनुभूती पहावयास मिळणार आहे. टोपली कारवीसह पठारावर चवर, दीपकांडी, आभाळी, सीतेची आसवे, सोनकी, तेरडा, भारांगी, धनगरी फेटा, तुतारी, कुमुदिनी तलावामध्ये कुमुदिनी यासह टप्प्याटप्प्याने कास पुष्प पठारावर वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलायला सुरुवात झाली आहे. हंगामाकरिता सहा गावातील १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पार्किंग ते कास पुष्प पठार यादरम्यान पर्यटकांसाठी मोफत बस सेवा पुरविली जाणार आहे तसेच पार्किंग मध्ये सहा शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तसेच ठीक ठिकाणी पिण्यासाठी मिनरल वॉटर चे पाणी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठिकठिकाणी पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट कास पुष्प पठारावर पर्यटक फुले पाहण्यासाठी आल्यानंतर फुले पाहून झाल्यानंतर त्यांना फोटोसेशन करता यावे याकरिता पठार परिसरामध्ये ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट देखील समितीच्या वतीने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी देखील पर्यटक सेल्फी पॉईंटचा फोटो सेशन करून आनंद लुटताना दिसत आहेत. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइन ची सुविधा www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये, गाईड फी ४५ मिनिटांकरिता शंभर रुपये ( प्रति ग्रुप १० पर्यटक संख्या), उपद्रव शुल्क दोन हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना ४० रुपये प्रवेश शुल्क मात्र सोमवार ते शुक्रवार येणे बंधनकारक असेल तसेच संबंधित शाळा कॉलेज महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांचे पत्र आवश्यक असेल. कास पुष्पोत्सवाचा शुभारंभ करताना उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, जावली तहसीलदार हनुमंत कोळेकर वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण अर्जुन गमरे ,अध्यक्ष दत्तात्रय किर्दत व इतर मान्यवर.