‘काटेपूर्णा’ १००% भरले; २ दरवाजे उघडले:ने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीही गरज भागली

‘काटेपूर्णा’ १००% भरले; २ दरवाजे उघडले:ने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीही गरज भागली

अकोला शहरासह एमआयडीसी, मू्र्तिजापूर, बोरगाव मंजू तसेच खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठ्यावरील ६४ खेडी गावांची तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ सुरू असल्याने २२ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता काटेपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरला. दरम्यान, यंदा २२ सप्टेंबरलाच प्रकल्प १०० टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीही गरज भागली आहे. जलाशय परिचलन आराखड्यानुसार धरणात १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान १०० टक्के जलसाठा असणे निर्धारित आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी ७:३० वाजता धरणाचे दोन दरवाजे ३० सेंटिमीटर उंचीने उघडून ५१.१६ घ.मी. प्रति सेकंदाने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात ६८९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे,अशी माहिती महान पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. काटेपूर्णा प्रकल्पामध्ये साठा १०० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने धरण परिसर जलमय दिसून येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत पाण्याचे आरक्षण ठरणार यावर्षी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन सिंचन प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण १५ ऑक्टोबरपर्यंत निश्चित केले जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांची सिंचनासाठी किती आहे हे देखील ठरवले जाणार आहे. त्यानंतर सहकारी पाणीवापर संस्थासोबत पाणी वाटपासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. – अमोल वसूलकर , कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.

​अकोला शहरासह एमआयडीसी, मू्र्तिजापूर, बोरगाव मंजू तसेच खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठ्यावरील ६४ खेडी गावांची तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ सुरू असल्याने २२ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता काटेपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरला. दरम्यान, यंदा २२ सप्टेंबरलाच प्रकल्प १०० टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीही गरज भागली आहे. जलाशय परिचलन आराखड्यानुसार धरणात १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान १०० टक्के जलसाठा असणे निर्धारित आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी ७:३० वाजता धरणाचे दोन दरवाजे ३० सेंटिमीटर उंचीने उघडून ५१.१६ घ.मी. प्रति सेकंदाने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात ६८९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे,अशी माहिती महान पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. काटेपूर्णा प्रकल्पामध्ये साठा १०० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने धरण परिसर जलमय दिसून येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत पाण्याचे आरक्षण ठरणार यावर्षी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन सिंचन प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण १५ ऑक्टोबरपर्यंत निश्चित केले जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांची सिंचनासाठी किती आहे हे देखील ठरवले जाणार आहे. त्यानंतर सहकारी पाणीवापर संस्थासोबत पाणी वाटपासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. – अमोल वसूलकर , कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment