कथ्थक, लावणी सादर; क्ले आर्ट, शास्त्रीय गायनाने वाढवली रंगत:युवा महोत्सव; तिसऱ्या दिवशी विविध कला गुणांचे दर्शन, आज होणार समारोप‎

कथ्थक, लावणी सादर; क्ले आर्ट, शास्त्रीय गायनाने वाढवली रंगत:युवा महोत्सव; तिसऱ्या दिवशी विविध कला गुणांचे दर्शन, आज होणार समारोप‎

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गेल्या तीन दिवसांपासून विद्यापीठाचा “छात्र तरंग’ युवा महोत्सव रंगला आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी या महोत्सवात विविध कलांचे रंग भरले. सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. शास्त्रीय नृत्यात प्रामुख्याने कथ्थक आणि ओडिसी नृत्य सादर करण्यात आली. नृत्य स्पर्धेमध्ये वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य सादर केली. लोकनृत्यात जागरण, आराधी, खंडोबा, गोंधळ व विविध आदिवासी नृत्यांचा समावेश होता. चिकट कला अंतर्गत विद्यार्थ्यांनी निसर्ग, फेस मास, ॲनिमल अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती सादर केली. फोटोग्राफी अंतर्गत ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर ऑन द स्पॉट पेंटिंग, तसेच पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये पाणी वाचवा जीवन वाचवा , आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्यसनांच्या विळख्यात तरुण या विषयावरची विविध वास्तववादी चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली. याशिवाय व्यंगचित्रांमधून सध्या चालू असलेल्या विविध घडामोडींवर मार्मिक भाष्य करण्यात आले. माती कलेअंतर्गत मुला-मुलींनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. वादविवाद स्पर्धेत अमरावती ग्रामीण व शहर यातील महाविद्यालयांनी सहभागी सहभाग नोंदवला. यामध्ये “परिवारो मे घटती नैतिक शिक्षाही समाज मे बढते दुष्कर्म का कारण है? या विषयावर विरोधी व बाजूने विद्यार्थ्यांनी मते व्यक्त केली. एकांकिका स्पर्धेत अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. मूकनाट्य व प्रहसन या दोन स्पर्धांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. समूहगान स्पर्धेमध्ये अमरावती ग्रामीण व शहर अशा दोन्ही परिसरातील १७४ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वकृत्व स्पर्धेमध्ये अमरावती ग्रामीण व शहर जिल्ह्यातील ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. आज रांगोळी, मेहंदीसह अनेक स्पर्धा सोमवार, ३० सप्टेंबर रोजी युवा महोत्सवाचा समारोप होत आहे. सोमवारी मेहंदी, रांगोळी व स्थापना म्हणजेच इन्स्टॉलेशन अशा तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली समारोप संपन्न होत असून यावेळी आमदार वसंत खंडेलवाल तथा अॅड. गिरीश देशपांडे, प्राचार्य जगदीश उपस्थित राहणार आहेत.

​संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गेल्या तीन दिवसांपासून विद्यापीठाचा “छात्र तरंग’ युवा महोत्सव रंगला आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी या महोत्सवात विविध कलांचे रंग भरले. सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे. शास्त्रीय नृत्यात प्रामुख्याने कथ्थक आणि ओडिसी नृत्य सादर करण्यात आली. नृत्य स्पर्धेमध्ये वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य सादर केली. लोकनृत्यात जागरण, आराधी, खंडोबा, गोंधळ व विविध आदिवासी नृत्यांचा समावेश होता. चिकट कला अंतर्गत विद्यार्थ्यांनी निसर्ग, फेस मास, ॲनिमल अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती सादर केली. फोटोग्राफी अंतर्गत ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तर ऑन द स्पॉट पेंटिंग, तसेच पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये पाणी वाचवा जीवन वाचवा , आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्यसनांच्या विळख्यात तरुण या विषयावरची विविध वास्तववादी चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली. याशिवाय व्यंगचित्रांमधून सध्या चालू असलेल्या विविध घडामोडींवर मार्मिक भाष्य करण्यात आले. माती कलेअंतर्गत मुला-मुलींनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. वादविवाद स्पर्धेत अमरावती ग्रामीण व शहर यातील महाविद्यालयांनी सहभागी सहभाग नोंदवला. यामध्ये “परिवारो मे घटती नैतिक शिक्षाही समाज मे बढते दुष्कर्म का कारण है? या विषयावर विरोधी व बाजूने विद्यार्थ्यांनी मते व्यक्त केली. एकांकिका स्पर्धेत अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केल्या. मूकनाट्य व प्रहसन या दोन स्पर्धांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. समूहगान स्पर्धेमध्ये अमरावती ग्रामीण व शहर अशा दोन्ही परिसरातील १७४ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वकृत्व स्पर्धेमध्ये अमरावती ग्रामीण व शहर जिल्ह्यातील ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. आज रांगोळी, मेहंदीसह अनेक स्पर्धा सोमवार, ३० सप्टेंबर रोजी युवा महोत्सवाचा समारोप होत आहे. सोमवारी मेहंदी, रांगोळी व स्थापना म्हणजेच इन्स्टॉलेशन अशा तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली समारोप संपन्न होत असून यावेळी आमदार वसंत खंडेलवाल तथा अॅड. गिरीश देशपांडे, प्राचार्य जगदीश उपस्थित राहणार आहेत.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment