मुंबई: अभिनेत्री कतरिना कैफ सध्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार या सर्व सुपरस्टार्ससोबत तिने स्क्रिन शेअर केलं आहे. पण २००३ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कतरिनाने तिच्या पहिल्याच चित्रपटात इंटिमेट सीन्स दिलेले. तिचे हे सीन बॉलिवूडचे बॅडमॅन गुलशन ग्रोव्हर (Katrina Kaif Gulshan Grover Kissing Scene) यांच्यासोबत होते. या सीन्समुळे मोठी खळबळ उडाली होती. हा चित्रपट होता ‘बूम’. या सिनेमात एक किसिंग सीनही होता. गुलशन सांगतात की, या सीनपूर्वी ते फार अस्वस्थ होते. त्यांनी दोन तास स्वत:ला खोलीत बंद करून घेत सरावही केला होता.

या सिनेमात अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ आणि झीनत अमानही महत्त्वाच्या भूमिकेत होते. ‘बुम’ सिनेमामध्ये त्या काळाच्या दृष्टीने खूपच बोल्ड कंटेट दाखवण्यात आला होता. तर कतरिना आणि गुलशन यांचा किसिंग सीन सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. आजही अनेकगा हा सीन व्हायरल होताना दिसतो. युट्यूबवरही या सीनच्या व्हिडिओंना कोट्यवधी Views मिळाले आहेत.

हे वाचा-अभिनेत्री दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल; म्हणाली- मृत्यू जवळून पाहिल्यामुळे…

गुलशन ग्रोव्हर यांनी या सीनविषयी एका मुलाखतीमध्ये भाष्य केले होते. त्यांनी असे म्हटलेले की, ‘तो सीन खूप कठीण होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तो इंटिमेट सीन मला अमिताभ बच्चन यांच्यासमोर करायचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे कतरिना कैफ त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. त्यामुळे मी हा सीन करण्याबाबत कंफर्ट नव्हतो. मी खूप घाबरलो होतो. या किसिंग सीनचं शूटिंग सुरू झाल्यानंतर दिग्दर्शक कैझाद उस्ताद यांनी तिनही कलाकारांना त्यांचा सीन समजावला होता.

हे वाचा-राजू यांनी रिक्षा चालवून भरलेली पोटाची खळगी; आज दारात उभी ऑडी अन् BMW!

गुलशन पुढे सांगतात की, दिग्दर्शकाने त्यांना जेव्हा सीन समजावला होता तेव्हा त्यांची चिंता अधिक वाढली होती. त्यामुळे हा सीन चित्रित करण्यापूर्वी ग्रोव्हर यांनी स्वत:ला खोलीत बंद करून घेत २ तास या सीनची प्रॅक्टिस केली होती. त्यांना याची चिंता होती की यामुळे कतरिनाला अस्वस्थ वाटू नये. ते पुढे सांगतात की कतरिनाने मोठ्या आत्मविश्वासाने तो सीन केला होता. पण त्यांच्यासाठी आणि कतरिनासाठी हा नक्कीच एक कठीण सीन होता, असेही त्यांनी नमुद केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.