मराठ्यांना बाजुला ठेवणे तुमची घोडचूक असेल:सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, मनोज जरांगेंचा अमित शहांवर निशाणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आम्ही अनेक आंदोलने हाताळली आहेत. त्याप्रमाणे राज्यातील मराठा आंदोलनही व्यवस्थित हाताळू, असे म्हटले होते. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अमित शाह यांचा खरपूस समाचार घेतला आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले, तर तुम्हाला सत्ता मिळवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. पण मराठ्यांना बाजुला ठेवले तर तर ती तुमची घोडचूक असेल. मराठ्यांच्या पाठिंब्याविना कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार घेत आहेत. रविवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, अमित शाह आणि देवेंद्र फडवणीस याना मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल. धनगर आणि धनगडचा आदेश काढणार असाल, तर मराठा आणि कुणबी एकच आहेत, असा आदेशही काढायला काहीच हरकत नाही. हा आदेश निवडणुकीआधीच काढावा, असे ते म्हणाले. अमित शहांना कत्तली करायच्या आहेत का? पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, राज्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. त्याआधी राज्यात भाजप नव्हते. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंना तुम्ही दूर लोटले आणि एका बांगलादेशी बाईला देशात आणले. अमित शहा यांना कत्तली करायच्या आहेत का? असा सवालही जरांगे यांनी अमित शहा यांना केला आहे. पुढे ते म्हणाले की, यांना दादागिरी करून सत्ता मिळवायची आहे. पण जनतेने राजकीय एन्काउंटर केला, तर तुम्ही दिसणार नाही, अशा शब्दांत जरांगेंनी टीका केली आहे. छगन भुजबळांना सवाल मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले. भुजबळ यांच्या आवाहनाप्रमाणे आम्ही निवडणुकीत जागा निवडून आणल्या, तर ते त्यांचे आरक्षण सोडून मराठा समाजाला आरक्षण देतील का? ते राजकारण सोडतील का? गोरगरिबांचा करत असलेला विरोध, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये बंद करणार का?, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण असतानाही तुम्ही त्याला विरोध करत आहात. हे सर्व तुम्ही थांबवणार का? असे अनेक प्रश्न मनोज जरांगे यांनी यावेळी केले.