मुंबई : सेमी फायनलला सुरुवात होण्यापूर्वी आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आता भाराला ओपन चॅलेंज दिले आहे. शांतपणे आपली भूमिका मांडताना केनने भारताच कौतुक करत असतानाच त्यांना एक खुले आव्हानही दिले आहे.

भारतीय संघ या वर्ल्ड कपसाठी फेव्हरेट समजला जात आहे. पण न्यूझीलंडच्या संघाने यापूर्वीही भारताला बाद फेरीत धक्के दिले आहेत. गेल्या वेळी झालेल्या वर्ल्ड कपमध्येही भारत प्रबळ दावेदार समजला जात होता. पण सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ हा भारताला कधीही धक्का देऊ शकतो, असे म्हटले जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन हा नेहमीच शांत असतो, पण आता तर त्याने भारताला ओपन चॅलेंज दिल्याचे समोर आहे.

केन विल्यमसन म्हणाला की, ” तुम्ही आमच्या संघाला अंडरडॉग्स म्हणता, पण त्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. दुसरी गोष्ट भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे, हे सर्वांनीच मान्य करायला हवे. हार्दिक पंड्याला दुखापत झाली, त्यानंतर भारतीय संघाचे संतुलन थोडे बिघडले नक्कीच होते. पण त्यांनी त्यावर चांगला पर्याय शोधून काढला. भारताने आपला महत्वाचा खेळाडू गमावला होता, पण तरीही त्यांनी संघाची चांगली बांधणी केली. त्यामुळे भारतीय संघाला आपली लय कायम राखता आली. यापूर्वी आमच्या संघाबरोबरही अशा गोष्टी घडल्या आहेत आणि आम्ही त्यामधून बाहेर आलो आहोत. त्यामुळे या गोष्टी आमच्यासाठी नक्कीच नवीन नाहीत. भारतीय संघ सर्वोत्तम संघांपैकी एक आहे, हे आम्हालाही माहिती आहे. पण ज्या दिवशी आमचा दिवस असतो त्या दिवशी कोणी काहीही केले तर विजय आमचाच होतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचे दडपण आम्ही कधीच घेत नाही. त्यामुळे आम्ही सेमी फायनलच्या सामन्याचे टेंशन अजिबात घेतलेले नाही. भारतावरच त्याचे जास्त प्रेशर असेल.” आमचा दिवस असेल तर तेव्हा आम्ही कोणालाही ऐकत नाही, असे थेट केनने म्हटले आहे. त्यामुळे भारतीय संघाबरोबर ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

भारत आणि न्यूझीलंड यांच्या सामन्यात कोणता संघ फायनलमध्ये पोहोचतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *