खादी व ग्रामोद्योग मंडळात 350 नवे कर्मचारी घेणार:प्रस्ताव मान्य, खादी ग्रामोद्योगचे सभापती रवींद्र साठे यांची माहिती
खादी व ग्रामोद्योग मंडळाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे गरजेचे असून येत्या काळात ३५० नवे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने मान्यताही प्रदान केली आहे. राज्यमंत्री दर्जा असलेले या मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी आज, गुरुवारी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ही माहिती देण्यात आली. ते म्हणाले, कुण्या एकेकाळी मंडळाकडे १२०० कर्मचाऱ्यांचा लवाजमा होता. परंतु सध्या राज्यभरात केवळ तीनशे कर्मचारी उरले आहेत. त्यामुळे मंडळाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यात लोकसहभाग वाढविणे अडचणीचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर मी तातडीने हा निर्णय घेतला असून त्यास राज्य शासनाची मान्यताही प्राप्त करुन घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात या मंडळाचे मनुष्यबळ वाढविले जाणार असून त्याद्वारे गतवैभवाकडे वाटचाल केली जाणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विदर्भातील ५७ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय प्रबोधिनीत सुरु आहे. त्यासाठीच रवींद्र साठे याठिकाणी आले आहेत. यानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या मंडळाने ‘मधुबन’ हा मधाचा ब्रँड विकसित केला असून त्यावर जोर दिला जात आहेत. त्याअंतर्गत अमरावतीसह विदर्भात सात गावांची निवड पूर्ण झाली असून आणखी सहा गावे निवडली जातील. याआधारे शेतकऱ्यांना पुरक व्यवसायाची जोड दिली जाणार असून त्याआधारे आत्महत्या कमी करण्यासही मंडळाचा हातभार लागेल. दरम्यान अमरावती जिल्ह्यात आमझरी (ता. चिखलदरा) हे पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून नावरुपास येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला जिल्हा समन्वयक प्रदीप चेचरे व इतर कर्मचारीही उपस्थित होते. चार योजनांवर अधिक लक्ष साठे म्हणाले, सध्या पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेवर काम सुरु आहे. यासोबतच मदत केंद्र, प्रधानमंत्री रोजगार योजना आणि मुख्यमंत्री रोजगार योजना यावरही मंडळाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या चारही योजनांच्या माध्यमातून गावा-गावांत रोजगाराचे नवे जाळे तयार केले जाणार आहे.