खामगाव-नांदुरा रस्त्यावर ट्रक आणि बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू:सुमारे 20 जण जखमी; सर्व जखमींवर अकोला रुग्णालयात उपचार सुरू

खामगाव-नांदुरा रस्त्यावर ट्रक आणि खाजगी बसच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या तिघांना अकोला येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बुलढाणा येथे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकमध्ये ही भीषण टक्कर झाली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या संबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुलढाणा येथील खामगाव-नांदुरा रस्त्यावर हा अपघात झाला. येथे मध्य प्रदेश परिवहनची बस अचानक एका ट्रकला धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की ट्रक आणि बसच्या पुढच्या भागांचा चक्काचूर झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बसमधील 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतरचा व्हिडिओ
बुलढाण्यातील अपघातानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताचे भयानक दृश्य पाहता येते. अपघात इतका भीषण होता की ट्रकमध्ये ठेवलेल्या सर्व विटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MPSRTC) एका खासगी बस आणि एका ट्रकमध्ये टक्कर झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या कुटुंबीयांचीही रुग्णालयात धाव घेतली. या घटनेशी संबंधित इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघातानंतर आक्रोश प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि विटा वाहून नेणारा ट्रक समोरासमोर धडकला. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि आक्रोश सुरू झाला. स्थानिक लोक मदतीसाठी धावले आणि पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.