मुंबई- क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अथिया आणि केएल राहुलने अगदी खाजगी पद्धतीने लग्न केलं. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे अथिया आणि केएल राहुलला लग्नात कोट्यवधींच्या भेटवस्तू मिळाल्या. या साऱ्यांची किंमत कोटींमध्ये आणि लाखांमध्ये आहे.

सुनील शेट्टी यांनी दिलं महागडे घर

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांना कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांकडून लक्झरी भेटवस्तू मिळाल्या. ईटाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने या जोडप्याला १ कोटी ६४ लाखांची ऑडी कार भेट दिली. तर सुनील शेट्टीने मुलगी अथिया आणि जावई केएल राहुल यांना सुमारे ५० कोटी रुपयांच्या किंमतीचं एक भव्य अपार्टमेंट भेट म्हणून दिलं.


विराट कोहलीने केएल राहुलला कार दिली

सुनील शेट्टी यांचा जवळचा मित्र जॅकी श्रॉफ यांनी अथियाला ३० लाख रुपयांचे घड्याळ भेट दिले. तर अथियाचा जवळचा मित्र अर्जुन कपूरने तिला डायमंड ब्रेसलेट दिले, ज्याची किंमत दीड कोटी रुपये आहे. त्याचबरोबर केएल राहुलला विराट कोहलीकडून २ कोटी १७ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून मिळाली. महेंद्रसिंग धोनीने केएल राहुलला ८० लाख रुपयांची कावासाकी निन्जा बाईक दिली. अशाप्रकारे अथिया शेट्टी आणि केएल राहुलला लग्नात जवळपास ६० कोटींचे गिफ्ट मिळाले.


आयपीएलनंतर नवं जोडपं देईल रिसेप्शन पार्टी

सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर अथिया शेट्टी आणि केएल राहुल विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या दिवशी अथियाने पेस्टल गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर केएल राहुल क्रीम रंगाच्या शेरवानी सूटमध्ये खूप सुंदर दिसत होता. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सुनील शेट्टी आयपीएलनंतर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करतील, ज्यामध्ये मनोरंजन आणि क्रीडा उद्योगातील सेलिब्रिटी उपस्थित असतील.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *