रविवारी विश्वचषकाच्या फायनलमध्ये कांगारूंकडून निराशाजनक ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. यानंतर भारत पुढील आव्हानासाठी तयारी करत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर टी२० मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघ नुकताच जाहीर झाला आहे. यात कर्णधारपदाची धुरा सुर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे देण्यात आली आहे.

बीसीसीआयने २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार असेल तर ऋतुराज गायकवाड पहिल्या तीन टी-२० सामन्यांसाठी उपकर्णधार असेल. तर श्रेयस अय्यर उपकर्णधार म्हणून चौथ्या आणि पाचव्या टी-२० साठी संघात सामील होईल. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाटा कर्णधार मॅथ्यू वेड आहे.
ऑस्ट्रेलियाच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी…
दरम्यान २३ नोव्हेंबरपासून सुरू होणारी टी-२० मालिका विझाग, त्रिवेंद्रम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद या पाच ठिकाणी होणार आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारी (२३ नोव्हेंबर) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरुवात होईल. दुसऱ्या टी-२० साठी दक्षिण भारतात थांबेल. रविवारी (३ डिसेंबर) होणार्‍या अंतिम सेटसह उर्वरित मालिकेसाठी संघ गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथेही जातील. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका स्पोर्ट्स १८ आणि कलर्स सिनेप्लेक्सवर थेट प्रक्षेपित केली जाईल, तर सामन्याचा थेट प्रवाह JioCinema अॅप आणि वेबसाइटवर सामन्याच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजल्यापासून उपलब्ध असेल.

सामन्यांचे वेळापत्रक :-
पहिला सामना- २३ नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
दुसरा सामना- २६ नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
तिसरा सामना- २८ नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
चौथा सामना- ०१ डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
पाचवा सामना- ०३ डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.
World Cup : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील फायनलमुळं अहमदाबाद एअरपोर्टचं नशीब पालटलं, २३ तासात नव्या विक्रमाची नोंद
भारताचा संघ :-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार

ऑस्ट्रेलियाचा संघ :-
मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *