पाकिस्तानला त्यांचा नेट रन रेट सुधारण्यासाठी गतविजेत्या इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल. मात्र, असे होणे अशक्य आहे. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान आपले सर्वस्व पणाला लावणार आहे. पण असे झाले नाही तर बाबर सेनेच्या हाती काहीच लागणार नाही आणि तो सामन्याचा पहिला चेंडू न टाकताही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
एकही चेंडू टाकल्याशिवाय पाकिस्तान उपांत्य फेरीतून कसा बाहेर पडेल?
न्यूझीलंड संघ सध्या ०.७४३ च्या नेट रन रेटने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान ०.०३६ आणि ८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध केवळ २ गुणांची गरज नाही तर नेट रनरेटचीही गरज आहे.
न्यूझीलंडपेक्षा चांगला नेट रन रेट ठेवण्यासाठी, पाकिस्तानला सुमारे २८७ धावांनी विजय मिळवावा लागेल आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना २८४ चेंडू राखून सामना जिंकावा लागेल. जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची आणि इंग्लंडला लवकर बाद करण्याची संधी आहे. पण याची शक्यताही फार कमी आहे. पण पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली तर पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच सामना संपेल.
याचे कारण म्हणजे दुसऱ्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानला २.४ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. जे अशक्य आहे. पाकिस्तानने सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकली तर त्यांना डोळे मिटून प्रथम फलंदाजी बाजू निवडावी लागणार आहे. पण इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास पाकिस्तानचा संपूर्ण प्लॅन उद्ध्वस्त होईल. सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच पाकिस्तान सामन्यातून जवळपास बाहेर पडेल.