नवी दिल्ली : श्रीमंत व्हायचे नसेल असा कदाचितच कोणती व्यक्ती असेल. आपल्याकडे कोट्यवधींची संपत्ती असावी आणि ऐषारामात आयुष्य जगावे असे प्रत्येकाला वाटते, पण श्रीमंत होणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. श्रीमंत होण्यासाठी आणखी एक गोष्ट जी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे कठोर परिश्रम. कठोर परिश्रमाशिवाय कोणीही एक रुपयाही कमावता येत नाही. मात्र आज काळ बदलला असून थोडं कष्ट करून लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो करोडो रुपये कमावतात ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे.

कमी वयात प्रसिद्धी झोतात येणार कमीच आहेत. अशीच एक मुलगी जिने वयाच्या ११ व्या वर्षांपासून दरमहिना एक कोटींहून अधिकची कमाई केली, परंतु ही मुलगी आता लवकरच निवृत्त होऊन आपल्या शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

हवी तेवढी पेन्शन मिळवा, एकच हप्ता भरा आणि आजीवन पेन्शन, तुम्हाला माहित आहे का योजना?
कोण आहे कमी वयातील कोट्याधीश मुलगी
एका महिन्या कोटी रुपयांची कमाई करणारी १२ वर्षीय पिक्सी कर्टिसकडे मर्सिडीज कारही आहे. ऑस्ट्रेलियन रहिवासी पिक्सी Pixie’s Pix या नावाची कंपनी चालवते जी एक ऑनलाइन कंपनी असून अनेक प्रकारचे हेअर बो आणि हेडबँड विकते. पिक्सीसाठी तिची आई Roxy Jacenko यांनी व्यवसाय सुरू केला होता, ज्या स्वतः एक व्यावसायिक महिला आहेत.

रिटायरमेंटला गाठी हवा पैसा, मग ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; वृद्धापकाळात येणार नाही पैशाची अडचण
पिक्सी कर्टिसचा व्यवसाय काय?

अगदी लहान वयातच पिक्सी कर्टिसने वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने स्वतःचे ऑनलाइन खेळण्यांचे दुकान सुरू केले ज्याला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला. याआधीही तिने एक उपक्रम सुरू केला होता जो बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. तुम्हाला कदाचित आठवत असेल की तीन वर्षांपूर्वी फिजेट स्पिनर नावाचे एक खेळणे बाजारात आले होते, जे पिक्सी कर्टिसने लॉन्च केले होते. या खेळण्यामुळे तिला दरमहा एक कोटी रुपये मिळायचे. यासोबतच ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भरपूर कमाई करते.

निवृत्तीतील गुंतवणूक म्हणून स्थावर मालमत्तेचा पर्याय योग्य आहे का
पिक्सीने तिची आई Roxy Jacenko हिच्या मदतीने Pixie’s Fidgets नावाची खेळण्याची कंपनी सुरू केली जी २०२१ मध्ये लाँच करण्यात आली आणि पहिल्या ४८ तासांत त्यांची सर्व खेळणी विकली गेली. तर पहिल्याच महिन्यात कंपनीने $२००,००० पेक्षा जास्त महसूल कमावला होता.

Read Latest Business News

पिक्सी कर्टिसची एकूण संपत्ती किती आहे?
पिक्सीने इंस्टाग्रामवर एक लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान डेली मेल ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये नोंदवले होते की पिक्सीची १८ व्या वर्षापर्यंत २१ अब्ज दशलक्ष डॉलर इतकी निव्वळ संपत्ती असू शकते, जी एकट्या पिक्सी बो कंपनीची असू शकते. तर Pixies Fidgets देखील यामध्ये जोडल्यास ही रक्कम आणखी वाढू शकते. दहाव्या वाढदिवशी पिक्सीच्या आईने लेकीला २.२५ कोटी रुपयांची मर्सिडीज कार भेट दिली, त्यानंतर तरुण कोट्यधीशाची सर्वत्र चर्चा रंगली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *