मुंबई: एसटी बस चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत. एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइल वापरण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. नवा नियम लागू करण्यात आला असून याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी
महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.
आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली: मनोज जरांगे पाटील

काय आहे नियमावली :

१. रा.प. बस / वाहन चालवितांना चालकांनी भ्रमणध्वणीचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
२. रा.प. बस / वाहन चालवित असतांना चालकांनी आपला भ्रमणध्वणी वाहकाकडे देण्यात यावा.
३. विनावाहक फेरीवरील चालकांनी वाहन चालवितांना आपला भ्रमणध्वणी आपल्या बॅगमध्ये ठेवावा.
४. चालक वाहन चालवित असताना हेडफोन आणि Bluetooth इत्यादी उपकरणाचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
५. सदर सूचना ही भाडेतत्वावरील चालकांना देखील बंधनकारक राहील सबब विभागांनी आपल्या विभागाच्या अखत्यारीतील भाडेतत्वावरील वाहनपुरवठादार कंपनी यांना अवगत करावे.

मित्राने दार ठोठावलं, तो प्रतिसाद देईना, दार तोडताच समोर भयंकर दृश्य, नागपुरात डेंटिस्टने…
६. चालकांनी स्टेअरिंगवर असताना भ्रमणध्वणीचा वापर करीत असल्याचे निदर्शनांस आल्यास अशा चालकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल.
७. सर्व मार्गतपासणी पथकांनी, सुरक्षा आणि दक्षता खाते यांचे तपासणी पथकांनी आपल्या दैनंदिन तपासणी कामगिरीमध्ये रा. प बसचालक वाहन चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलत असल्याचे, गाणे ऐकत असल्याचे, हेडफोन व Bluetooth इत्यादी उपकरणाचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांचे अहवाल सादर करावेत.
८. विभागास अहवाल प्राप्त झाल्यानंतर नमुद चालकांवर तातडीने खातेनिहाय प्रमादीय कारवाई करण्यात यावी.
९. मार्गतपासणी पथकांनी व सुरक्षा व दक्षता खाते यांचे तपासणी पथकांनी बसची तपासणी करतांना चालकाने भ्रमणध्वनी वाहकाकडे दिला आहे किंवा काय ? याबाबत देखील तपासणी करावी.
१०. विभागांनी उपरोक्त सूचना देण्यासाठी सर्व आगारांमध्ये स्वंतत्र नोंद वही ठेवून सूचना मिळालेबाबत चालकांची स्वाक्षरी घेण्यात यावी. आगारांमध्ये सूचना फलकावर याबाबत चालकांसाठी सूचना प्रसारित करण्यात यावी.
११. सदर सूचनेबाबत प्रत्येक आगारात रबरी शिक्का तयार करुन वाहन परीक्षकामार्फत वाहन रोजनाम्यावर शिक्का मुद्रित करावा.

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय, राज्य सरकार मराठा-ओबीसी वाद लावण्यात व्यस्त : नाना पटोले
Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *