गोपाळ गुरव, पुणे : बांगलादेश संघासाठी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा निराशाजनक राहिली. या संघाला केवळ अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघाला पराभूत करण्यात यश आले. हे दोन अपवाद वगळता बांगलादेशला आपली छाप पाडताच आली नाही. त्यामुळे या संघात ऑल इज नॉट वेल अर्थात सारे काही सुरळीत नसल्याच्या बातम्या आता समोर येऊ लागली आहे. अखेरच्या सामन्यातील पराभवानंतर आता बांगलादेशच्या संघाला अजून काही धक्के बसणार आहेत.भारतात होत असलेल्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची अखेरची साखळी लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेशची डाळ काही शिजली नाही आणि त्यांना वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. मात्र, या लढतीपूर्वीच बांगलादेश संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. बांगलादेश संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अॅलन डोनाल्ड यांनी वर्ल्ड कपनंतर गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, त्यांनी बांगलादेश संघासोबतचा करार वाढविण्यास नकार दिला आहे. त्याला कारण ठरले आहे तो बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन. शकीबने श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेले मॅथ्यूजविरुद्ध टाइम्ड आउटचे अपील केले होते. त्याची ही कृती खेळ भावनेच्या विरुद्ध आहे, असे डोनाल्ड यांना वाटले. त्यामुळे त्यांनी थेट शकीबला विरोध केला. यामुळे डोनाल्ड यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. त्यामुळे कर्णधार शकीब आणि डोनाल्डमध्ये शीतयुद्ध रंगल्याची चर्चा आहे. डोनाल्ड यांनी थेट बांगलादेश संघाचा वाढीव कराराचा प्रस्तावच धुडकावला आहे. त्यातच कर्णधार शकीब बोटाच्या दुखापतीमुळे अखेरची लढत खेळणार नाही. बांगलादेश संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे. मुख्य प्रशिक्षक चरिथ हथुरुसिंघा, सहायक प्रशिक्षक निक पोथास, फिरकी गोलंदाज प्रशिक्षक रंगना हेरथ, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक शेन मॅकडरमॉट यांचेही करार पुढील काही दिवसांत संपुष्टात येतील. या वर्ल्ड कपमधून उपांत्य फेरीच्या बाहेर पडणारा बांगलादेश पहिला संघ होता. आता टॉप-८मध्ये राहून २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये राहण्याचे आव्हान बांगलादेशसमोर आहे.बांगलादेश संघात धुसफूस सुरू असल्याचेही म्हटले जात आहे. खेळाडूंमध्ये सुसंवादाचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. मायदेशी परतल्यानंतर बांगलादेश संघातील आणखी काही कहाण्या बाहेर पडण्याची शक्यता आहे. पुण्यात झालेल्या संघाच्या बैठकीत डोनाल्ड यांनी करार वाढविण्यास नकार दिला. डोनाल्ड जवळपास २० महिने बांगलादेश संघासोबत होते. त्यांच्यासोबत सुरुवातीला २०२२च्या टी-२० वर्ल्ड कपसाठीच करार करण्यात आला होता. त्यांना त्यांच्या कराराला मुदतवाढ मिळाली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *