सुपर-४ मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी दोन गुण आहेत. त्यामुळे गुरुवारी होणारी लढत ही नॉकआउट असेल. या लढतीत जो विजय मिळवेल तो १७ सप्टेंबर रोजी जेतेपदासाठी भारताविरुद्ध खेळले. भारताने मंगळवारी श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले.
अंतिम फेरीतील दुसरा संघ कोणता हे ठरवण्यासाठी फक्त मॅच हा फॅक्टर नाही तर पाऊस देखील निर्णायक ठरणार आहे. श्रीलंकेत जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसामुळे पाक-श्रीलंका लढत रद्द झाली तर दोन्ही संघांना समान गुण मिळतील. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी ३ गुण होतील. अशात अंतिम फेरीत जाणारा दुसरा संघ नेटरन रेटच्या आधारावर ठरवला जाईल. श्रीलंकेचे नेट रनरेट वजा ०.२०० तर पाकिस्तानचे वजा १.८९२ इतके आहे. जर पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर श्रीलंकेविरुद्धची लढत कोणत्याची परिस्थितीत जिंकावी लागले. लढतीत पराभव झाला किंवा पावसामुळे मॅच झाली नाही तर पाकिस्तान स्पर्धे बाहेर होईल.
पाकिस्तानसाठी धोकादायक श्रीलंका
बांगलादेशचा पराभव आणि भारताला कठोर आव्हान दिल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने हे दाखवून दिले आहे की टीममध्ये काही प्रमुख खेळाडू नसले तरी ते चांगली कामगिरी करू शकतात. स्पर्धा सुरू होण्याआधी वानिंदु हसरंगा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा दुखापतीमुळे बाहेर झाले. पण लंकेच्या संघाने काही युवा खेळाडूंच्या जोरावर चमकदार कामगिरी करून दाखवली. भारताविरुद्ध लंकेच्या गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यामुळेच पाकिस्तानसाठी ते धक्का देऊ शकतात.