नवी दिल्ली: भारताने २००८ साली १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा विराट कोहली हा त्या संघाचा कर्णधार होता. त्याच वर्षी विराट कोहली भारतीय संघात देखील दाखल झाला. नंतर विराट टीम इंडियाचा कर्णधार आणि जागातील सर्वोत्तम फलंदाज ठाला. भारताच्या २००८ सालच्या १९ वर्षाखालील संघात आणखी एक कोहली होता, त्याचे नाव होते तरुवर कोहली. जालंधरचा हा कोहली आज देखील धावांचा डोंगर उभा करत आहे. पण त्याची चर्चा कधी झाली नाही. तरुवर हा फलंदाजीसोबत मध्यम गतीने गोलंदाजी देखील करतो.

रणजी ट्रॉफीच्या या हंगामात तरुवर कोहलीने धमाकेदार फलंदाजी केली आहे. मिझोरामकडून खेळताना त्याने ६ सामन्यातील १० डावात ७४.६च्या सरासरीने ७४६ धावा केल्या. यात ३ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने २०३ धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. फलंदाजीसोबत त्याने २४ विकेट घेतल्या आहेत.

स्पर्धेच्या गेल्या हंगामात तरुवरला फक्त ३ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्याने १३१.५०च्या सरासरीने ५२६ धावा केल्या होत्या. यात ३ शतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणीच्या ५५ सामन्यात त्याने ५३.८च्या सरासरीने ४ हजार ५७३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ७४ विकेट आहेत. तर लिस्ट एच्या ६० डावात ४०च्या सरासरीने १ हजार ९१३ धावांसह ४१ विकेट त्याने घेतल्या आहेत.

तरुवर कोहलीने २००८च्या १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये पहिल्या ३ सामन्यात अर्धशतक झळकावले होते. ६ सामन्यात त्याच्या नावावर २१८ धावा होत्या. स्पर्धेतील तो ५व्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी खेळाडू होता. त्याच वर्षी त्याने पंजाबकडून रणजीत पदार्पण केले. रणजीच्या २०१९-२०च्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. १६ डावात त्याने ७१च्या सरासरीने ९९८ धावा केल्या होत्या. या हंगामात पंजाबकडून त्याने त्रिशतक केले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *