मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सामन्यातील पराभवानं टीम इंडियाच्या पाठिराख्यांना धक्का बसला. यंदाच्या स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी पाहता विजेतेपदाची अपेक्षा होती. आयसीसीच्या स्पर्धांमधील विजेतेपदांचा दुष्काळ यंदा संपेल अशी आशा सगळे बाळगून होते. पण ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. वर्ल्डकप मोहिमेची कटू सांगता झाल्यानंतर आता विराट कोहलीबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे.भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा असलेल्या कोहलीनं त्याचा व्यवस्थापक बंटी सजदेहसोबतचे व्यावसायिक संबंध संपवले आहेत. बंटीच्या कॉर्नरस्टोन कंपनीनं कोहलीच नव्हे, तर रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंच्या व्यवस्थापनाचं काम पाहिलं आहे. खेळाडूंचे पब्लिक रिलेशन्स आणि एँडॉर्समेंट पाहण्याची जबाबदारी कॉर्नरस्टोनकडे असते. स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट क्षेत्रातील ही मोठी कंपनी आहे.कॉर्नरस्टोन कंपनी गेल्या दशकभरापासून कोहलीच्या पीआर आणि एँडॉर्समेंटचं काम पाहायची. तेव्हापासून आणि कोहलीचे घनिष्ट संबंध आहेत. कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूसाठी कॉर्नरस्टोन कंपनी काम करायची. त्यामुळे बंटी आणि विराट खूप चांगले मित्र झाले. अनेक मोठ्या कंपन्यांसोबत विराटनं करार केले. त्यात कॉर्नरस्टोनचा महत्त्वाचा वाटा होता. बंटी सजदेह भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहचा चुलत भाऊ आहे. त्यामुळे बंटी रोहितचा मेहुणा लागतो.कॉर्नरस्टोन कंपनी विराटला अन्य खेळाडूंच्या तुलनेत अधिक प्राधान्य द्यायची असं म्हटलं जातं. पण आता विराट कोहलीनं बंटीच्या कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. कोहली स्वत:ची कंपनी सुरू करणार आहे. विराट आणि बंटीचे संबंध अतिशय उत्तम राहिले आहेत. कोहलीनं त्याच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोहलीला ब्रँड म्हणून समोर आणण्यात कॉर्नरस्टोननं महत्त्वाची भूमिका बजावली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *