कोलकाता अत्याचार:आरोपी संजय रॉयने दिली गुन्ह्याची कबुली; घटनेपूर्वी रात्री आरोपी गेला होता रेड लाइट एरियात
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी संजय रॉयने पॉलिग्राफ टेस्टमध्ये आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. घटनेच्या दिवशी रात्री त्याने काय केले त्याचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. आर. जी. कर रुग्णालयात येऊन अत्याचार करण्यापूर्वी तो रेड लाइट एरियात गेला होता. त्या वेळी त्याचा मित्रही सोबत होता. दोघांनी यथेच्छ दारू ढोसली होती. त्यानंतर ते दक्षिण कोलकात्यात आणखी एका रेड लाइट एरियात गेेले. रस्त्यात एका मुलीची छेडही काढली. रेड लाइट एरियातून दोघे रुग्णालयात गेले. पहाटे ४.३० वाजता संजय सेमिनार हॉलच्या कॉरिडॉरमध्ये गेला. अत्याचार व हत्या केल्यानंतर तो आपला मित्र तथा पोलिस अधिकारी अनुपम दत्ताकडेही गेला होता. दरम्यान, सीबीआयने सोमवारी दुसऱ्यांदा पॉलिग्राफ टेस्टला सुरुवात केली. रविवारी सीबीआयने माजी प्राचार्य घोष यांच्या घरी छापा टाकला.
डॉक्टरवरील अत्याचाराविरोधात कोलकात्यात दिव्यांगांनी रॅली काढली.
दुसरीकडे, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला होता. आंदोलनासाठी आलेल्या एका व्यक्तीने तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या मुलीला बलात्काराची धमकी दिली. हे काम करणाऱ्याला १० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही त्या व्यक्तीने जाहीरपणे सांगितले. या प्रकरणाची बंगाल बाल संरक्षण आयाेगाने स्वत:हून दखल घेतली आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांना पोक्सोअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. काळे कारनामे; संजयला पोर्नोग्राफीचे व्यसन.. मैत्रिणीकडे तिचे न्यूड छायाचित्रही मागितले होते आरोपी संजयला पोर्नोग्राफी पाहण्याचे व्यसन आहे. त्याचा मोबाइल तपासला असता त्यात अनेक पोर्न व्हिडिओ क्लिप दिसून आल्या. घटनेच्या दिवशी त्याने मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तिची न्यूड छायाचित्रे मागवली होती.दरम्यान, पीडित महिला डॉक्टरच्या शरीरात व बाहेर एकूण २५ जखमा होत्या. तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. माजी प्राचार्य संदीप घोष यांचीही चौकशी सुरू आहे.
संजय रॉय पोलिस वेल्फेअर सेलमध्ये होता. रुग्णालयातही बंदोबस्त होता.